मराठी बातम्या /बातम्या /Viral /

एकटे राहणारे ऑक्टोपस एकमेकांवर फेकतात मलबा! विचित्र वागण्याबाबत ऑस्ट्रेलियात संशोधन

एकटे राहणारे ऑक्टोपस एकमेकांवर फेकतात मलबा! विचित्र वागण्याबाबत ऑस्ट्रेलियात संशोधन

ऑक्टोपस

ऑक्टोपस

ऑक्टोपस हा प्राणी खरं तर एकटा राहतो. त्याला एकमेकांसोबत राहणं आवडत नाही; मात्र तिथल्या समुद्रात काही ऑक्टोपस एकमेकांवर सागरातला मलबा फेकत असल्याचं संशोधकांना आढळलं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Lanja, India

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : सागरी विश्व अतिशय वैविध्यपूर्ण आहे. समुद्राच्या खाली खूप मोठं विश्व आहे. त्यात प्रवाळ, समुद्रातले छोटे छोटे जीव असं बरंच काही आहे. तिथल्या सर्व गोष्टी आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ऑक्टोपस हा प्राणी. मुळातच या प्राण्याचा आकार इतरांपेक्षा वेगळा असल्यानं तो सर्वांच्या आकर्षणाचा बिंदू ठरतो. आता या ऑक्टोपसनं अभ्यासकांनाही पेचात टाकलंय. ऑस्ट्रेलियातल्या जर्विस बे इथं ऑक्टोपस एकमेकांवर सागरी मलबा फेकत असल्याचं आढळलं आहे. त्यांच्या या कृतीमागचं कारण संशोधक शोधत आहेत. 'इंडिया टीव्ही'ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.

ऑक्टोपस हा समुद्रातला एक वेगळा प्राणी आहे. त्याचा आकार, मेंदू, सहज निसटण्याची कला, त्याला असलेले अनेक पाय या कारणांमुळे संशोधक त्याबाबत सतत अभ्यास करत असतात. सध्याही ऑस्ट्रेलियातल्या जर्विस बे इथं ऑक्टोपसबाबत एक संशोधन सुरू आहे. ऑक्टोपस हा प्राणी खरं तर एकटा राहतो. त्याला एकमेकांसोबत राहणं आवडत नाही; मात्र तिथल्या समुद्रात काही ऑक्टोपस एकमेकांवर सागरातला मलबा फेकत असल्याचं संशोधकांना आढळलं. संशोधकांना त्यामागचं कारण कळत नाहीये.

हे वाचा - आश्चर्य! हाडामांसाऐवजी 'प्लॅस्टिकचं बाळ'; महिलेच्या डिलीव्हरीनंतर डॉक्टरही शॉक

नेचर जर्नलमधल्या एका संशोधनात याबाबत खुलासा करण्यात आला. ऑक्टोपसने सागरी प्रवाळ, शिंपले व इतर काही गोष्टी गोळा करून दूर फेकल्या. काही वेळा हे ऑक्टोपस या गोष्टी एकमेकांवरही फेकत होते. असं करण्यामागे काय कारणं आहेत, याचा शोध संशोधक घेत आहेत. ऑक्टोपसने असं करण्यामागे त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न असू शकतो, असा अंदाज आहे. तसंच एकमेकांसोबत बोलणं किंवा काही संपर्क साधणं यासाठीही ते असं करत असतील, असं संशोधकांना वाटत आहे. काहींच्या मते ऑक्टोपस अशा प्रकारची कृती एरव्हीही करत असतील, कदाचित आजपर्यंत ती उघड झाली नसेल.

हे वाचा - रशिया-युक्रेन युद्धात सैनिकाच्या छातीत घुसला बॉम्ब; पुढं जे घडलं ते चकित करणारं

ऑक्टोपस या प्राण्याबाबत संशोधकांना आधीपासूनच खूप आकर्षण आहे. त्याचं कारण त्याचं वेगळेपण आहे. त्याला 8 पाय असतात. तसंच त्याला एकच नाही, तर अनेक मेंदू असतात. यामुळे तो कोणतीही क्रिया अतिशय जलद करतो. इतर सागरी प्राण्यांच्या तुलनेत हा बुद्धिमान प्राणी असतो. अनेक पाय असल्यामुळे ऑक्टोपस स्वतःचा बचाव करू शकतो, पटकन निसटू शकतो. काही संशोधकांच्या मते, ऑक्टोपस इतके बुद्धिमान असतात, की ते कोडीही सोडवू शकतात. त्यामुळे ऑक्टोपसबाबत आणखी जाणून घेण्यासाठी संशोधक सतत अभ्यास करत असतात. तशाच एका संशोधनादरम्यान ऑक्टोपसचं हे विचित्र वागणं दिसून आलं; मात्र त्या वागण्यामागचं नेमकं कारण संशोधकांना अजून समजलेलं नाही.

First published:

Tags: Research, Sea