Home /News /viral /

परिस्थिती छोटी, पण मन मोठं! दिव्यांग भिकाऱ्याने पत्नीसाठी घेतली 90 हजाराची गाडी, कहाणी वाचून पाणावतील डोळे

परिस्थिती छोटी, पण मन मोठं! दिव्यांग भिकाऱ्याने पत्नीसाठी घेतली 90 हजाराची गाडी, कहाणी वाचून पाणावतील डोळे

संतोष साहू आणि त्यांची पत्नी मुन्नी साहू हे छिंदवाडा जिल्ह्यातील अमरवाडा येथील रहिवासी आहेत. संतोष पायाने दिव्यांग आहेत. ते ट्रायसायकलने फिरून भीक मागतात आणि पत्नी मुन्नीबाई त्यांची मदत करते.

    भोपाळ 23 मे : प्रेमात जात-धर्म, श्रीमंत, गरीब किंवा इतर गोष्टी दिसत नाहीत, असं म्हटलं जातं. सध्या याचाच प्रत्यय देणारी एक अनोखी प्रेम कहाणी मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातून समोर आली आहे. यात एक भिकारी आपल्या पत्नीवर असलेल्या प्रेमामुळे चर्चेत आला आहे. संपूर्ण जिल्ह्यात सध्या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा सुरू आहेत. भीक मागून आयुष्य जगणाऱ्या संतोषने आपल्या पत्नीला गिफ्ट म्हणून मोपेड बाईक दिली (Beggar Bought Bike for Wife). आता दोघं मोपेडवरच भीक मागण्यासाठी जातात. संतोष साहू आणि त्यांची पत्नी मुन्नी साहू हे छिंदवाडा जिल्ह्यातील अमरवाडा येथील रहिवासी आहेत. संतोष पायाने दिव्यांग आहेत. ते ट्रायसायकलने फिरून भीक मागतात आणि पत्नी मुन्नीबाई त्यांची मदत करते. महिलेला पार्टीत आमंत्रित न करणं सहकाऱ्यांना भोवलं; द्यावी लागली 72 लाखाची नुकसान भरपाई संतोष साहू यांनी सांगितलं की ते स्वतः ट्रायसायकलवर बसतात आणि त्यांची पत्नी याला धक्का देण्याचं काम करायची. अनेकदा अशी परिस्थिती यायची की रस्ता खराब असल्याने त्यांच्या पत्नीला या ट्रायसायकलला धक्का देणं खूप कठीण जायचं. पत्नीला होणारा हा त्रास संतोषला पाहावत नव्हता. यादरम्यान अनेकदा त्यांची पत्नी आजारीही झाली. यात तिच्या उपचारासाठी बरेच पैसे खर्च झाले. एक दिवस मुन्नीने संतोषला मोपेड खरेदी करण्याचा सल्ला दिला. परिस्थिती बिकट असतानाही संतोषने ठरवलं होतं की काहीही झालं तरी पत्नीसाठी मोपेड खरेदी करायचीच. डॉक्टरांसमोर रडणं महिलेला पडलं महागात; बिलचा आकडा पाहून हादरलीच! दोघंही बस स्टॅण्ड, मंदीर आणि मशिदीच्या बाहेर भीक मागत असे आणि दररोज जवळपास 300 ते 400 रुपये कमवत असे. सोबतच दोघांना आरामात दोन वेळचं जेवणही मिळत असे. अशाप्रकारे ही रक्कम जमा करत संतोषने ४ वर्षात ९० हजार रूपये जमा केले आणि या शनिवारी कॅश देऊन मोपेड खरेदी केली. कोणीतरी याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Emotional, Viral news

    पुढील बातम्या