मराठी बातम्या /बातम्या /Viral /

दिसेल तिथं या कीड्याला ठेचून मारा नाहीतर...; शिकारीची पद्धत वाचूनच अंगाचं पाणी पाणी होईल

दिसेल तिथं या कीड्याला ठेचून मारा नाहीतर...; शिकारीची पद्धत वाचूनच अंगाचं पाणी पाणी होईल

या कीड्यापासून सावधान!

या कीड्यापासून सावधान!

या कीड्याची शिकार करण्याची पद्धत खूपच वेगळी आणि खतरनाक आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Priya Lad

मुंबई, 06 डिसेंबर : धरतीवर कित्येक जीवजंतू आहेत. त्यापैकी काहींना आपण नेहमी पाहतो. त्यांच्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत किंवा धोक्याबाबत आपल्याला माहिती असतं. त्यामुळे असे जीव दिसताच आपण त्यांना नष्ट करतो किंवा त्यांच्यापासून दूर राहतो. पण काही जीव असे आहेत, जे आपल्याला क्वचितच दिसतात त्यांच्यामुळे आपल्याला काय धोका होऊ शकतो याची माहिती नसते. अशाच एक जीव म्हणजे या फोटोत दिसणारा हा कीडा.

पावसाळ्यात तुम्ही साप, घोण, गांडुळ अशा कीड्यांना पाहिलं असेल. याच कीड्यांच्या प्रजातीतील हा कीडा आहे. ज्याला हॅमरहेड म्हटलं जातं. तसा दिसायला हा गांडुळसारखाच आहे. पण गांडुळासारखे त्याचे फायदे नाहीत तर तो खूप खतरनाक आहे. त्याची शिकार करण्याची पद्धत इतकी भयंकर आहे की तो दिसला तर त्याच्यापासून दूरच राहा. किंबहुना त्याला मारूनच टाका.

हे वाचा - PHOTO : या जंगलात शिकारीसाठी दबा धरून बसलेत 5 खतरनाक प्राणी; प्रत्येकाला 20 सेकंदात शोधलंत तर तुम्हाला मानलं

कीड्याच्या नावावरूनच त्याचं वैशिष्ट्य समजेल. हॅमरहेड म्हणजे हातोड्यासारखं डोकं असलेला. या कीड्याला तुम्ही नीट पाहिलं तर त्याच्या एका टोकाला हातोड्यासारखा आकार दिसतो आहे. हा कीडा मोठ नसतो. तो जेलसारखा असतो. त्याची शिकार करण्याची पद्धत खूपच वेगळी आहे. शिकार दिसताच तो शरीरातून एक चिकट द्रव सोडतो, त्यात टेट्रोडोटॉक्सिन नावाचं केमिकल असतं. हा द्रव शिकाऱ्याचं पाणी करतो आणि हे पाणी पिऊन हॅमरहेड आपली भूक मिटवतो.

हे वाचा -Video : मानवाच्या तीन पिढ्या जगणारा कासव; ज्याने पाहिली 31 राज्यपालांची कारकीर्द

माणूस किंवा प्राण्यांसाठी हे धोकादायक नाहीत. पण झाडाझुडुपांना हानी पोहोचू शकते. कारण सामान्यपणे हा कीडा गांडुळांना खातो. गांडुळ शेतकऱ्यांना किती फायदेशीर आहेत हे तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे गांडुळांना खाणारे हे कीडे जिवंत राहिल्यास यांच्यामुळे गांडुळ नष्ट होतील. अप्रत्यक्षरित्या हे कीडे पर्यावरणाचे शत्रू ठरतील. तसं जीवांना मारणं चांगलं नव्हे तर या कीड्याच्या संरक्षणासाठी तज्ज्ञही दुजोरा देत नाहीत.

First published:

Tags: Other animal, Viral