मुंबई, 5 डिसेंबर : जगभरात माणूस सरासरी 60 ते 70 वर्षांचे आयुष्य जगतात. काही अगदी शंभरीही ओलांडतात. पण, हे प्रमाण अतिशय कमी आहे. प्राण्यांबद्दल बोलायचं झालं तर कासव हा प्राणी दीर्घायूषी असल्याचे मानले जाते. जगातील सर्वात जास्त काळ जगणाऱ्या कासवाला 190 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. जोनाथन नावाचे हे कासव जगातील सर्वात वृद्ध कासव आहे. चार फूट उंच जोनाथन दक्षिण पॅसिफिकमधील सेंट हेलेना बेटावर राहतो आणि त्याच्या ऐतिहासिक वर्धापन दिनानिमित्त उत्सव आयोजित केले जातात. या आठवड्याच्या अखेरीस तीन दिवसांच्या मेजवानीने याचा शेवट होत आहे. हे वृद्ध कासव आता आंधळे झाले आहे. हे 1882 मध्ये सेशेल्समधून ब्रिटीश परदेशी प्रदेशात पहिल्यांदा आणले गेले होते जेव्हा ते सुमारे 50 वर्षांचे होते.
ब्रिटीश वृत्तपत्र द मिररच्या मते, जोनाथनला तत्कालीन गव्हर्नर सर विल्यम ग्रे-विल्सन यांना भेट म्हणून देण्यात आले होते. ते सध्याचे गव्हर्नर निगेल फिलिप्स राहत असलेल्या प्लांटेशन हाऊसच्या हवेलीत राहत होते. त्याने बेटावर त्याच्या काळात 31 राज्यपालांची कारकीर्द पाहिली.
The South Atlantic island of St. Helena is celebrating the birthday of the world’s oldest living land animal – a Seychelles giant tortoise called Jonathan, who is turning 190. https://t.co/0ttcztdVcp pic.twitter.com/5NLDMdIRkw
— CNN (@CNN) December 4, 2022
योग्य वय कसे समजते?
1882 ते 1886 दरम्यान घेतलेल्या जुन्या छायाचित्रात जोनाथनचे अंदाजे वय दिसून आले. तो बागेत दिसला होता. या वर्षाच्या सुरुवातीला, जोनाथनला जगातील सर्वात वृद्ध प्राणी म्हणून गिनीज रेकॉर्डमध्ये नाव देण्यात आले होते. तेव्हापासून आजतागायत या कासवाची नोंद कायम आहे.
वाचा - इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक; नदीप्रमाणे वाहतोय लाव्हा, पुलही वितळले, VIDEO
यापूर्वीचा विक्रम तुई मलिलाच्या नावावर होता. या कासवाचा 1965 मध्ये वयाच्या 188 व्या वर्षी मृत्यू झाला. 1777 च्या सुमारास कॅप्टन जेम्स कुक यांनी टोंगा राजघराण्याला हे कासव दिले होते. असे मानले जाते की जोनाथनचा जन्म 1832 मध्ये कधीतरी झाला होता. परंतु, अचूक तारीख माहित नाही. त्याऐवजी, गव्हर्नर फिलिप्स यांनी 4 डिसेंबर रोजी त्यांचा अधिकृत वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral news