या जंगलात घुसताना सावध राहा. कारण इथं काही खतरनाक प्राणी शिकारीसाठी दबा धरून बसले आहेत. जर तुमची नजर तीक्ष्ण असेल तर तुम्ही या प्राण्यांना शोधून दाखवा.
जंगलातील हे पहिलं दृश्य. इथं एक खतरनाक बिबट्या आहे. तसा तो अगदी डोळ्यासमोरच आहे. पण पटकन तुमच्या नजरेला पडणारा नाही.
या फोटोत तुम्हाला जिराफ शोधायचं आहे. आता उंच मान असलेला जिराफ दिसणं तसं काही कठीण नाही. पण या फोटोत मात्र तेसुद्धा आव्हानात्मकच आहे.
फक्त पानंच दिसणाऱ्या या फोटोत पाण्यातील राक्षस म्हणजेच मगर लपून बसली आहे. जी एका डोळ्याने तुमच्याकडे पाहत आहे.
आता या पाचही फोटोतील प्राणी तुम्हाला दिसले असतील तर ते कुठे आहेत हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नाहीतर याचं उत्तर पाहण्यासाठी आमच्या वेबसाइटला पुन्हा भेट द्या.