जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Shocking! भिंतीतून बाहेर आले 'केस', व्यक्तीने हात लावताच...; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

Shocking! भिंतीतून बाहेर आले 'केस', व्यक्तीने हात लावताच...; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

भिंतीतून केस

भिंतीतून केस

भिंतीतून बाहेर आलेल्या केसांना खेचण्याचा प्रयत्न व्यक्तीने केला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 मे : आपल्या आजूबाजूला अशा बऱ्याच घटना घडत असतात, ज्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. असाच एक शॉकिंग व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात चक्क भिंतीतून केस बाहेर येताना दिसला. एका व्यक्तीच्या घराच्या भिंतीतून हे केस दिसत होते. या व्यक्तीने जवळ जात त्या केसांना हात लावला. त्यानंतर पुढे जे घडलं ते धक्कादायक आहे. भिंतीतून येणाऱ्या या केसांचा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या अंगावरही अक्षरशः काटा येईल. भिंतीच्या कोपऱ्यात असलेल्या या केसांच्या झुपक्याचं सत्य वेगळंच होतं. ते पाहून तुम्ही हादरून जाल. दिसतं तसं नसतं असं म्हणतात ना, त्याचा प्रत्यय तुम्हाला या व्हिडीओतून येईल.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता दोन भिंतींचा हा कोपरा आहे. या कोपऱ्यातून काळ्या केसांचा झुपका दिसतो आहे. पाहताच क्षणी भिंतीत कुणीतरी आहे आणि त्याचे केस भिंतीबाहेर आले असं वाटतं आहे. त्यामुळे असं दृश्य पाहिल्यावर धक्काच बसेल. हे दृश्य पाहणाऱ्यालाही धडकी भरली आहे. अगदी तुमच्याही काळजात धस्सं झालं असेल. भाडं मिळत होतं, पण भाडेकरू कधी दिसला नाही; 6 वर्षांनी भेटायला घरी येताच घरमालक हादरला पण व्हिडीओ पुढे नीट पाहा. जेव्हा या भिंतीतून येणाऱ्या केसांचं सत्य तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला आणखी मोठा धक्का बसले. ज्या व्यक्तीच्या घराच्या भिंतीत हे असे केस होते. त्या व्यक्तीने हिंमत केली आणि ती जवळ गेली. जवळ जाऊन तिने त्या केसांना हात लावलं. अरे बापरे! हे काय, ते संपूर्ण केस भिंतीतून तुटून त्या व्यक्तीच्या हातात आले आणि पळू लागले. तुम्ही नीट पाहिलं तर भिंतीवर जे केस दिसत होते, ते प्रत्यक्षात केस नव्हतेच. ते कोळी होते. असंख्य कोळी. जे एकावर एक एकाच ठिकाणी भिंतीला चिकटले होते. ते इतक्या प्रमाणात होते की केसांचा झुपकाच वाटत होता. जसे या व्यक्तीने ते हातात धरले तसे ते सर्वजण पळू लागले. शेवटी व्यक्तीही हात झाडताना दिसतो. तरुणींना हॉटेल रुममध्ये दिसली धक्कादायक गोष्ट, पाहून सरकली पायाखालची जमीन @tarantula_insta इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

जाहिरात

तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात