ब्रिटन, 12 मे : भाडेकरू आणि घरमालक यांचा संबंध अनेकदा फक्त भाड्यापुरता येतो. म्हणजे भाड्याचे पैसे देण्याची तारीख जवळ आली की मालक भाडेकरूनला संपर्क करतो आणि एकदा का भाड्याचे पैसे मिळाले की त्याला काही देणंघेणं नसतं. असाच एक घरमालक ज्याला त्याच्या भाडेकरूनकडून भाड्याचे पैसे वेळेवर मिळत होते. पण त्याने कधी भाडेकरूनला पाहिलं नाही. एकदा तो आपल्या घरी गेला आणि त्याला जे दिसलं ते पाहून तो हादरलाच. ब्रिटनमधील हे प्रकरण आहे. एका व्यक्तीने आपलं घर भाड्याने दिलं होतं. त्याला त्याच्या खात्यात भाड्याचे पैसे येत होते. घर भाड्याने दिलं त्याला बरीच वर्षे झाली. पण या घरात राहणारा भाडेकरून कधी घराबाहेर पडलाच नाही. या घरात राहणआऱ्या व्यक्तीला 6 वर्षे आपण पाहिलंच नसल्याचं त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितलं. एक दिवस गॅस कनेक्शन चेक करण्यासाठी म्हणून घरमालक आपल्या भाड्याने दिलेल्या या घरात केला. तर तिथं त्याला जे दिसलं ते पाहून घामच फुटला. त्याच्या घरात चक्क सांगाडा होता. म्हणजे या घरात राहणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याचा मृत्यू बऱ्याच वर्षांपूर्वी झाला ज्याचा सांगाडा झाला होता. पण याची माहिती कुणालाही नव्हती. व्यक्तीने लगेच पोलिसांना कळवलं. मानवी मांस कसं असतं, कशी लागते चव? माणसांना खाणाऱ्या माणसांनीच सांगितलं, उत्तर हैराण करणारं घरमालकाच्या म्हणण्यानुसार, रॉबर्ट ज्या फ्लॅटमध्ये राहत होता तो हाऊसिंग कंपनी बोल्टनच्या मालकीचा होता. त्याच्या आत अठरा हजार फ्लॅट आहेत. यापैकी एका फ्लॅटमध्ये रॉबर्ट भाड्याने राहत होता. इव्हिनिंग न्यूजच्या वृत्तानुसार, फ्लॅटचा मालक गॅस कनेक्शन तपासण्यासाठी गेला तेव्हा त्याला एक सांगाडा सापडला. घरमालकाच्या म्हणण्यानुसार, त्याला गेली 6 वर्षे सातत्याने भाडे मिळत होते. यामुळे यात शंका नव्हती. मात्र, जवळपास राहणाऱ्या अनेकांनी सांगितले की त्यांनी रॉबर्टला 6 वर्षांपासून पाहिलं नाही. सापासोबत रात्रभर बेडवर झोपली अन् सकाळी उठताच जे घडलं ते भयानक PHOTOS… रॉबर्ट अल्टो असं या मृत व्यक्तीचं नाव. माहितीनुसार मे 2017 साली त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. पोलिसांनी हा सांगाडा आपल्या ताब्यात घेतला आहे. रॉबर्टचा मृत्यू नेमका कधी झाला, याची ठोस माहिती तपासानंतर समोर येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.