मराठी बातम्या /बातम्या /Viral /

गिर्यारोहकाचा हा VIDEO पाहून भल्याभल्यांना फुटला घाम,यात नेमकं आहे तरी काय?

गिर्यारोहकाचा हा VIDEO पाहून भल्याभल्यांना फुटला घाम,यात नेमकं आहे तरी काय?

गिर्यारोहण करणं हे मोठ्या धाडसाचं काम मानलं जातं. पावसाळ्यात तर अनेकजण गिर्यारोहणाचा आनंद घेतात.

गिर्यारोहण करणं हे मोठ्या धाडसाचं काम मानलं जातं. पावसाळ्यात तर अनेकजण गिर्यारोहणाचा आनंद घेतात.

गिर्यारोहण करणं हे मोठ्या धाडसाचं काम मानलं जातं. पावसाळ्यात तर अनेकजण गिर्यारोहणाचा आनंद घेतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 15 सप्टेंबर- गिर्यारोहण करणं हे मोठ्या धाडसाचं काम मानलं जातं. पावसाळ्यात तर अनेकजण गिर्यारोहणाचा आनंद घेतात. गड-किल्ल्यांवर, डोंगरावर जाऊन फोटो काढणं, व्हिडिओ तयार करणं व ते सोशल मीडियावरटाकणं, ही तर बऱ्याचजणांना सवय असते. पण तुम्हाला जर उंचीवरून खाली पाहण्याची, उंच ठिकाणांची भीती वाटत असेल तर हा गिर्यारोहणाचा व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्ही विचार करा. कारण हा व्हिडिओ अशा गिर्यारोहकाचा आहे, जो अतिशय अरुंद वाटा असणाऱ्या पर्वतरांगा पार करीत असून, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

लेलँड निस्की नावाच्या गिर्यारोहकाचा हा व्हिडिओ आहे. त्याने हजारो फूट उंचीवर जाऊन जणू काही मृत्युलाच कवटाळलं तर नाही ना, असाच प्रश्न तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पडेल. व्हिडिओमध्ये तो तीक्ष्ण आणि धारदार दगडांतून धावताना दिसतोय, कोणत्याही सुरक्षा रक्षकाशिवाय डोंगर चढतोय, अतिशय अरुंद वाट असणाऱ्या पर्वतरांगा ओलांडताना दिसतोय. त्यामुळेच हा व्हिडिओ खूपच चर्चेचा ठरलाय.

व्यावसायिक गिर्यारोहक आणि मार्गदर्शक असणाऱ्या लेलँड निस्की यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 2 सप्टेंबरला हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यानंतर तो खूपच व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये निस्की एका अरुंद टेकडीवरून चालत असल्याचं दिसतंय. हा डोंगर चढताना निस्की यांची प्रत्येक हालचाल तुम्हाला नक्कीच विचलित करू शकते. ते किती उंचीवर असतील, याचा अंदाज बांधतानाच तुमचा थरकाप उडू शकतो. या व्हिडिओला 24,330 लाईक्स मिळाले असून त्यावर अनेक कमेंट्ससह आल्या आहेत. तो 24,300 वेळा पाहिला गेला आहे. निस्कीचे इन्स्टाग्रामवर 70,400 फॉलोअर्स आहेत. तो अनेकदा त्याच्या साहसांचं व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करतो.

यावर क्लिक करून पाहा VIDEO

(हे वाचा:बापरे! जबड्यात हात धरून फरफटत नेलं आणि...; आणखी एका कुत्र्याच्या हल्ल्याचा भयानक VIDEO )

इथे शूट करण्यात आला व्हिडिओ

लेलँड निस्कीचा हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत असून, हा व्हिडिओ अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातील नॉर्थ कॅस्केड्स नॅशनल पार्कमध्ये असलेल्या फॉरबिडन पीकवर शूट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना त्यासोबत, 'मला अरुंद वाट असणारी चढाई खूप आवडते. काही दिवसांपूर्वी बोस्टन बेसिनकडे निघालो होतो, आणि कॅस्केड्सच्या आजूबाजूच्या सर्व अविश्वसनीय क्षेत्रांनी मी अत्यंत आश्चर्यचकित झालो. येथे लहान पर्वतरांगा आहेत, आणि मला नवीन ठिकाणं शोधण्यात खूप आनंद होतो,’ अशी कॅप्शनही निस्कीने लिहिली आहे.गिर्यारोहण करतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यामुळे गिर्यारोहणाला गेल्यानंतर तुम्हालाही असा साहसी व्हिडिओ तयार करण्याचा मोह होऊ शकतो. परंतु, गिर्यारोहण करताना धोकादायक ठिकाणी व्हिडिओ तयार करणं जीवावरसुद्धा बेतू शकतं याचं भान राखा. त्यामुळे व्हिडिओ शूट करण्याचा मोह आवरणं केव्हाही चांगलं.

First published:

Tags: Viral news, Viral photo