अरे देवा! हा माणूस खरोखरच प्रेमात 'पडला', VIDEO पाहून पोट धरून हसाल

अरे देवा! हा माणूस खरोखरच प्रेमात 'पडला', VIDEO पाहून पोट धरून हसाल

गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी गेला पण त्याच्यासोबत जे काय झालं ते पाहून खरच आवरणार नाही हसू.

  • Share this:

मुंबई, 09 जुलै : गुडघ्यावर बसून हातात अंगठी घेऊन मुलीला प्रपोज करणारे व्हिडीओ हे डोळ्यात पाणी आणतात. मात्र पहिल्यांदाच एक असा व्हिडीओ आहे जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हा माणूस खरोखरच प्रेमात 'पडला', असंच म्हणता येईल.

फेसबुक युझर मारिया गुगलिओट्टानं हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिओमध्ये तिचा होणारा नवरा तिला प्रपोज करण्यासाठी येतो. मात्र तिच्या जवळ येण्याआधीच घसरून पडतो. हा व्हिडीओ या तरुणाच्या गर्लफ्रेंडनेच शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

वाचा-आई पुढे पिल्लू मागे; पिल्लाला रस्ता ओलांडायला शिकवणाऱ्या गेंड्याचा VIDEO पाहा

वाचा-पाऊस आणि कोरोना दोघांपासून वाचवणारा Covid Umbrella; अनोख्या छत्रीचा Video Viral

मुख्य म्हणजे पडल्यानंतर या तरुणानं उठून लगेचच आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोजही केलं. या तरुणाचे नाव जॅक्सन असून, त्यानं आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी हे सरप्राइज प्लॅन केलं होतं. त्यासाठी एका तलावाच्या ठिकाणी तो आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन गेला. यावेळी त्यांचे मित्र व्हिडीओ आणि फूट काढत होते. त्याचेवळी हा मजेशीर व्हिडीओही शूट झाला. हा व्हिडीओ 5 जुलै रोजी शेअर करण्यात आला आहे.

वाचा-भयानक! कार चालवताना ब्रेकजवळ बसला होता सगळ्यात विषारी साप, पुढे झालं असं...

Published by: Priyanka Gawde
First published: July 9, 2020, 3:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading