मुंबई, 30 ऑगस्ट : सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडिओ पाहायला मिळतात. यात काही मजेशीर असतात तर काही व्हिडिओतून समाजातील चुकीच्या गोष्टींवर भाष्य केलं जातं. नुकतंच गुरुग्राममधील (Gurugram) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात एका सोसायटीतील व्यक्ती तेथील सुरक्षारक्षकाला (Security Guard) कानाखाली मारताना दिसत आहे. त्या व्यक्तीच्या वर्तवणुकीवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘टीव्ही नाईन हिंदी’नं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. गुरूग्राम येथील निर्वाणा कंट्री सोसायटीत अचानक लिफ्ट (Lift) थांबली. त्यामुळे त्यात एक व्यक्ती काही वेळासाठी अडकली होती. लिफ्ट सुरू झाल्यावर ग्राउंड फ्लोअरला येऊन थांबताच त्यातील व्यक्तीने सुरक्षारक्षकाला कानाखाली मारण्यास सुरूवात केली. मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव वरुण नाथ असल्याचं सांगितलं जात आहे. लिफ्टमध्ये अडकल्यानंतर अशोक नावाचा सुरक्षारक्षक उशिराने आला म्हणून वरुणने संतापाच्या भरात त्याला मारल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या घटनेनंतर इतर सुरक्षारक्षकांनी निदर्शनं करत आरोपीला अटक करण्याची मागणी केली. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीही आरोपीला अटक केली आहे. या आधीही नोएडामध्ये एका महिलेने सोसायटीतील गार्डशी गैरवर्तवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता. गुरुग्रामच्या निर्वाणा कंट्रीच्या ‘द क्लाज एन’मधील रहिवासी वरुण हे लिफ्टने ग्राऊंड फ्लोअरवर येत होते. तांत्रिक बिघाड झाल्यानं लिफ्ट अचानक थांबली. लिफ्टचा दरवाजा उघडला नाही. लिफ्टमध्ये अकडलेल्या व्यक्तीनं सुरक्षारक्षकाला फोन केला. सुरक्षारक्षक थोडा उशिरा पोहोचला. लिफ्ट सुरू करण्यास उशीर झाल्याचं सांगत वरुणने लिफ्टच्या बाहेर येताना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली व नंतर अशोक नावाच्या सुरक्षारक्षकाला कानाखाली मारल्या. अशोकला वाचवण्यासाठी आलेल्या दुसऱ्या सुरक्षारक्षकावरही वरुणने हात उगारला. घोड्याशी खेळ म्हणजे संकटाला आमंत्रण… तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार, Video Viral अखेर गुन्हा दाखल मारहाणीच्या घटनेनंतर सोसायटीचे सर्व सुरक्षारक्षक एकत्र आले. त्यांनी वरुण नाथ यांच्याविरोधात निदर्शनं केली. आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर (FIR) नोंदवला गेला. कलम 323 (जखमी करणे) आणि कलम 506 (धमकी देणे) या कलमांन्वये गुन्हा दाखल केला. याबाबत बोलताना सुरक्षारक्षक अशोक म्हणाले की, ‘लिफ्ट अडकल्यानंतर केवळ 3 ते 4 मिनिटांच्या आत मी मदतीसाठी धावून आलो. पण लिफ्टमधून बाहेर पडताच त्यांनी मला मारण्यास सुरुवात केली. चूक नसल्याचं सांगत असतानाही माझ्यासह लिफ्ट ऑपरेटरलाही त्यांनी मारहाण केली.’
#WATCH | Haryana: A resident of The Close North Apartments in Gurugram thrashed security guards after being briefly stuck in lift; FIR filed
— ANI (@ANI) August 29, 2022
I helped him get out of the lift within 3-4 minutes. As soon as he got out, he started beating me up: Guard Ashok Kumar
(CCTV visuals) pic.twitter.com/RDDwMQYdn8
दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मारहाण करणाऱ्या वरुण यांच्या वर्तवणुकीवर युजर्सनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. केवळ उच्च शिक्षण घेतलं म्हणजे वर्तवणूक चांगली असतेच असं काही नसतं. अशा शब्दांत युजर्सनी वरुण यांना सुनावलं आहे.