मराठी बातम्या /बातम्या /Viral /

घोड्याशी खेळ म्हणजे संकटाला आमंत्रण... तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार, Video Viral

घोड्याशी खेळ म्हणजे संकटाला आमंत्रण... तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार, Video Viral

प्राणी तसे स्वभावाने शांत असतात. परंतु कधी त्यांच्या मनात काय येईल याचा विचार कोणाही करु शकणार नाही

प्राणी तसे स्वभावाने शांत असतात. परंतु कधी त्यांच्या मनात काय येईल याचा विचार कोणाही करु शकणार नाही

प्राणी तसे स्वभावाने शांत असतात. परंतु कधी त्यांच्या मनात काय येईल याचा विचार कोणाही करु शकणार नाही

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 29 ऑगस्ट : सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत आपल्याला अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. यांपैकी काही व्हिडीओ हे खूपच सुंदर असतात. तर काही व्हिडीओ हे आपल्याला आश्चर्यचकित करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

तसे पाहाता हा व्हिडीओ तसा गंभीर आहे, परंतु या व्हिडीओमधील व्यक्तीला घोड्याने जी काही शिक्षा दिली आहे, ते पाहून तुम्हाला हसू येईल.

अनेक लोकांना प्राणी पाळण्याची आवड असते, ज्यामध्ये बहुतांश लोक मांजर आणि कुत्रा पाळतात. तर काही लोक गाय, बैल, शैळ्या पाळतात. घोडा देखील पाळीव प्राणीच आहे, परंतु त्याला पाळणाऱ्यांची संख्या फार कमी आहे.

हे प्राणी तसे स्वभावाने शांत असतात. परंतु कधी त्यांच्या मनात काय येईल याचा विचार कोणाही करु शकणार नाही आणि एकदा का त्यांना राग आला की मग ते कसलाही विचार करत नाहीत.

हे वाचा : झोपलेल्या महिलेच्या पाठीवर येऊन बसला साप, विषारी King Cobra नं पुढे काय केलं? पाहा Video

या व्हिडीओमध्ये दिसणार्‍या व्यक्तीसोबतही असेच काहीसं घडले आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस एका घोड्याच्या मागे चालताना दिसत आहे. पण अचानक ती व्यक्ती घोड्याची छेड काढू लागते आणि नेमकं त्याच वेळी त्याचं नशीब खराब की, काय पण या घोड्याने त्याला तोंडावर लाथ मारली, ज्यामुळे तो माणूस जोरात खाली पडला.

त्याचा चेहरा पाहून तुम्ही असं म्हणू शकता की, या माणसाला दिवसा तारे दिसले असावे.

The Darwin Awards नावाच्या ट्वीटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. अवघ्या 6 सेकंदांचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया युजर्सचे हसून हसून पोट दुखू लागलं असावं. हा व्हिडीओ कुठला आहे, हे समजू शकलेलं नाही.

हे वाचा : 'तो' एकटा आणि चारही बाजूंनी विषारी सापांनी घेरलं; जगातील सर्वात खतरनाक Snake Rescue Video

हा व्हिडीओ आतापर्यंत 2 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हजारो लोकांनी या व्हिडीओला लाइक आणि कमेंट देखील केलं आहे.

First published:

Tags: Shocking news, Shocking viral video, Top trending, Viral news