जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - आयुष्यात कधीच बुद्धिबळ न खेळता त्यातच बनवला World Record; भारताच्या लेकीची कमाल पाहून संपूर्ण जग थक्क

VIDEO - आयुष्यात कधीच बुद्धिबळ न खेळता त्यातच बनवला World Record; भारताच्या लेकीची कमाल पाहून संपूर्ण जग थक्क

भारतीय मुलीचा बुद्धिबळात अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड.

भारतीय मुलीचा बुद्धिबळात अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड.

या भारतीय मुलीने आयुष्यात कधीच बुद्धिबळ न खेळता त्यातच असं काही करून दाखवलं की संपूर्ण जग तिचं कौशल्य पाहून थक्क झालं.

  • -MIN READ Puducherry
  • Last Updated :

पुद्दुचेरी, 19 जानेवारी : बुद्धिबळ ज्याच्या नावातूनच तो बुद्धिचा खेळ आहे हे समजतं. त्यामुळे याला बुद्धिवानांचा खेळ म्हटलं जातं. हा खेळ वाटतो तितका सोपा नाही. आयुष्यात तुम्ही हा खेळ कधीच खेळला नसाल तर तुम्हाला काहीच जमणार नाही. पण आयुष्यात हा खेळ न खेळूनही एका मुलीने याच खेळात चक्क वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. भारताच्या लेकीने आयुष्यात कधीच बुद्धिबळ न खेळता त्यातच असं काही करून दाखवलं की संपूर्ण जग तिचं कौशल्य पाहून थक्क झाली. अगदी गिनीज बुकनेही त्याची नोंद घेतली. तसे बुद्धिबळाचे बरेच सामने तुम्ही पाहिले असतील. खेळ खेळून अनेकांनी विश्वविक्रम केले आहेत पण हा खेळ न खेळताही विश्वविक्रम करून दाखवला तो   पुद्दुचेरी तील एस. ओडेलिया जॅस्मीनने. ओडेलिया आयुष्यात कधीच बुद्धिबळ खेळली नाही. पण तरी तिने बुद्धिबळाचा रेकॉर्ड आपल्या नावे केला, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटलं असेल. खेळ न खेळता त्यात कसा काय रेकॉर्ड करता येईल? असं या मुलीने नेमकं केलं तरी काय?, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हे वाचा -  फक्त 5 टी-शर्ट हँगरला लटकवून केला World record; पठ्ठ्याने असा काय तीर मारला तुम्हीच पाहा VIDEO ओडेलियाला बुद्धिबळ खेळता येत नसलं तरी बुद्धिबळाचा पट मांडण्यात मात्र ती पटाईत आहे आणि तिच्या याच कौशल्याने तिने वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली. कमीत कमी वेळेत बुद्धिबळाचा सेट अरेंज करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड गेला आहे. 20 जुलै 2021 साली पद्दुचेरीमध्ये तिने हा रेकॉर्ड केला होता. पण गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने नुकताच आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे जो तुफान व्हायरल होतो आहे.  ज्यात ती अनोखा रेकॉर्ड करताना दिसते आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता ही मुलगी वेगाने बुद्धिबळावर सोंगट्या लावताना दिसते आहे. एका हातानेच ती सर्व करते आहे. हे वाचा -  VIDEO - World Record साठी धगधगत्या ज्वालामुखीवरून चालले तरुण; तोल गेला अन् असा शेवट झाला की… जॅस्मीनने  29.85 सेकंदात बुद्धीबळाचा सेट अरेंज करून किताब आपल्या नावे केला. जॅस्मीनने आयुष्यात कधीच बुद्धिबळ खेळला नाही. पण हा रेकॉर्ड करण्यासाठी तिने एक वर्षे मेहनत केली आणि तिच्या मेहनतीचं फळ तिला मिळालं.

जाहिरात

ओडेलियाआधी चार जणांनी हा रेकॉर्ड आपल्या नावे केला होता. 2021 साली अमेरिकेच्या डेव्हिश रशने 30.21 सेकंदात हा कारनामा केला होता. त्याआधी 2019 मध्ये अमेरिकेच्या नकुल रामास्वामीने 31.55 सेंकदात हे करून दाखवलं होतं. 2015 सालीसुद्धा अमेरिकेचेच्याच अल्वा वेईने 32.42 सेकंदात हा रेकॉर्ड केला होता. तर 2014  साली सर्बियातील डालीबोर जाब्लानोविक ने 34.20 हा रेकॉर्ड आपल्या नावे केला होता. पण या चौघांनाही पिछाडीवर टाकत आता भारताच्या ओडेलियाने नवा विश्वविक्रम रचला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात