पोर्ट विला, 24 सप्टेंबर : ज्वालामुखी आपण व्हिडीओत पाहिला तरी आपल्या अंगाला दरदरून घाम फुटतो. ज्वालामुखीतील धगधगती आग पाहिली की अंगावर काटा येतो. ज्वालामुखीच्या तपत्या लाव्हाने कितीतरी वस्तू क्षणात गायब गेल्याचं आपण पाहिलं आहे. त्यामुळे अशा ज्वालामुखीला दुरून पाहण्याची आपली हिंमत होणार नाही. पण दोन तरुण मात्र वर्ल्ड रेकॉर्डसाठी अशाच धगधगत्या ज्वालामुखीवरून चालायला गेला. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. आपण प्रसिद्ध व्हावं असं कुणाला वाटत नाही. गिनीज बुकमध्ये आपलं नाव असावं असं स्वप्न तर अनेकांचं असतं. असाच वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी या तरुणाचा असा खतरनाक स्टंट केला ज्याचा आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही. राफेल आणि अॅलेक्झांडर अशी या तरुणांची नावं. त्यांनी अॅक्टिव्ह ज्वालामुखीच्या वरून चालण्याची डेअरिंग केली. जागतिक विक्रमसाठी त्यांनी आपला जीव धोक्यात घातला. किंबहुना ते मृत्यूच्या दारातच गेले असं म्हणायलाही हरकत नाही. हे वाचा - बड्या नेत्यांना घेऊन जाणारं Helicopter Crash, विजेच्या तारेचा स्पर्श होताच…; अंगावर काटा आणणारा Video व्हिडीओत पाहू शकता धगधगत्या ज्वालमुखीच्या वर एक दोरी बांधलेली आहे. त्यावर हे तरुण चालताना दिसत आहेत. अगदी हळूहळू पावलं टाकत हे तरुण पुढे जात आहेत. खाली ज्वालामुखीची आग धगधगते आहे. ज्वालामुखीच्या ठिणग्या या तरुणांपर्यंत उडत होत्या. यावेळी एका तरुणाचा तोलही गेला आणि तो दोरीवरून खाली कोसळला. त्यावेळी तर आपल्या काळजाचा ठोकाच चुकतो. पण तुम्ही नीट पाहाल तर त्याच्या कमरेला दोरी बांधलेली आहे. ज्यामुळे सुदैवाने तो चालत असलेल्या दोरीला लटकतो आणि खाली ज्वालामुखीत कोसळत नाही. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हे दोघं माऊंट यासुर ज्वालामुखीच्या 137 फूट उंचावर होते. या जोडीने अॅक्टिव्ह ज्वालामुखीवर सर्वात लांब स्लॅकलाइन वॉक करण्याचा रेकॉर्ड या दोघांनी आपल्या नावे केला आहे. 261 मीटर लांब स्लॅकलाइनवर ते चालले.
हे धक्कादायक करतब करताना त्यांनी सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली होती. डोक्यावर हेल्मेट आणि गॅस मास्कही घातला होता. अगदी मृत्यूच्या दारात जाऊन त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. हे वाचा - प्रवासादरम्यान असं काय घडलं की एका बापावर आली मुलाचा मृतदेह समुद्रात फेकून देण्याची वेळ, वाचा हा व्हिडीओ पाहून सर्वजण शॉक झाले आहेत. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. ज्वालामुखीच्या वर दोरीवर कुणी चालू शकतो, यावर विश्वास ठेवणं कठीण असल्याची कमेंट एकाने केली आहे. तर काही युझर्सनी हा रेकॉर्ड कधीच ब्रेक न होणारा रेकॉर्ड असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी या अशा जीवघेण्या स्टंटची गरजच काय आहे, असा सवालही उपस्थित केला आहे.