वॉशिंग्टन, 10 डिसेंबर : हँगरला कपडे लावण्याचं काम तसं तुम्ही दररोज करत असाल. यात काही फार मेहनतीची किंवा प्रशिक्षणाची गरज नाही. पण तुम्हाला क्षुल्लक वाटणारं हे काम करूनही वर्ल्ड रेकॉर्ड करता येऊ शकतो याचा तुम्ही कधी विचार तरी केला होता का? पण अमेरिकेतील एका व्यक्तीने ते केलं. आपण करत असलेल्या या कामाचा त्याने असा वापर केला की गिनीज बुकमध्ये त्याची नोंद झाली आहे. याचा व्हिडीओही व्हायरल होतो आहे.
गिनीज बुकमध्ये नोंद होणं हे वाटतं तितकं सोपं नाही. किती तरी लोकांचं हे स्वप्न असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी ते खूप मेहनत घेतात. आपल्याजवळ असलेलं टॅलेंट वापरतात किंवा काहीतरी विचित्र करून संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतात. पण गिनीज बुकमध्ये नाव हवं यासाठी काही वेगळं, हटके, मोठं करण्याची गरज नाही हे अमेरिकेतील डेव्हिड रशने दाखवलं आहे. आपल्या दैनंदिन कामातूनही आपण जगात भारी आहोत हे सिद्ध करू शकतो.
हे वाचा - OMG! जगातील सर्वात महाग अननस; किंमत इतकी की याच्यासमोर सोनंही स्वस्त
डेव्हिड रश यांने हँगरला टी-शर्ट लटकवण्याचा अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय सोपं आहे. यात काय मोठा त्याने तीर मारला की त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला. तर तुम्हाला जितकं वाटतं तितकं हे सोपं नाही. कारण प्रत्येक रेकॉर्ड्ससाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे नियम, कायदे असतात. ज्याच्यात पात्र ठरल्यावरच लोकांना रेकॉर्डमध्ये सहभागी करून घेतलं जातं. डेव्हिडलाही या नियमांमुळे बऱ्याच समस्या आल्या.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नियमानसार डेव्हिडने आपल्या टी-शर्टचा वापर केला होता, ज्याचा गळा खूप मोठा होता. त्यामुळे त्यााल टी-शर्ट्स बदलावे लागले त्याने नंतर रेकॉर्ड्ससाठी बायकोचे टी-शर्ट्स वापरले. पण तेव्हा त्याचे हँगर्स खूप लहान होते. पण नियमांचं पालन करत त्याला टी-शर्ट त्याच हँगरला लटकवावे लागले, ज्यामुळे त्याला थोडा जास्त वेळ लागला. पण तरी त्याने फक्त 16 सेकंदात 5- टीशर्ट्स हँगरला लटकवले आणि आपला एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला.
हे वाचा - दहा-पंधरा नाही, एका छोट्या रिक्षातून चक्क ५० लोकांचा प्रवास, अखेर...
2015 साली हा रेकॉर्ड जपानच्या कॅटो कोजुमीने केला होता. त्याला यासाठी 27.93 लागले होते. तर डेव्हिडने हे 16.78 सेकंदात करून दाखवून हा रेकॉर्ड आपल्या नावावर करून घेतला.
डेव्हिडने आतापर्यंत 250 पेक्षा जास्त वर्ल्ड रेकॉर्ड डेव्हिडच्या नावे आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Record, Viral, World record