मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO : भरबाजारात नवऱ्याचे कपडे फाडले आणि पळवून पळवून मारलं; रस्त्यावर ट्रॅफिक जॅम

VIDEO : भरबाजारात नवऱ्याचे कपडे फाडले आणि पळवून पळवून मारलं; रस्त्यावर ट्रॅफिक जॅम

नवऱ्याला मारहाण करीत असतानाचा हा VIDEO सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

नवऱ्याला मारहाण करीत असतानाचा हा VIDEO सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

नवऱ्याला मारहाण करीत असतानाचा हा VIDEO सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

दमोह, 5 ऑगस्ट : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) दमोह जिल्ह्यातून एक विचित्र बातमी समोर आली आहे. या गावातील एका पत्नीने आपल्या वडिलांच्या मदतीने भररस्त्यात पतीची चांगलीच धुलाई केली. दोघांमध्ये घटस्फोटाचं प्रकरण सुरू आहे. दोघे जेव्हा बस स्टँडवर भेटले तेव्हा दोघांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की त्याचं मारहाणीत रुपांतर झालं. (Husbands clothes torn in bazar and wife hits him Traffic jam on the road see viral video)

पाहता पाहता रस्त्यावर गर्दी वाढू लागली. पत्नीने पतीला पळवून पळवून मारलं. रस्त्यावरच त्याचे कपडे फाडले. गर्दी वाढल्यानंतर काहींनी या घटनेचा व्हिडीओ शूट केला. पाटना जिल्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, बासा तारखेडा निवासी राजपूत आणि भावना या दोघांचं 4 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. काही वेळानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. त्यानंतर प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं.

" isDesktop="true" id="588442" >

हे ही वाचा-मंदिरात पुजाऱ्यासोबत आढळली महिला; नागरिकांनी दोघांना बाहेर काढून केली मारहाण

भावना पतीला सोडून माहेरी निघून आली आणि त्यानंतरन प्रकरण कोर्टात गेलं. त्यानंतर दोघांमधील संवाददेखील बंद झाला. दरम्यान त्या दिवशी भररस्त्यात दोघांची भेट झाली होती. त्यावेळी दोघांमधील संवादाचं रुप वादाने घेतलं. हा वाद इतका वाढला की याचं मारहाणीत पर्यावसान झालं. भररस्त्यात सुरू असलेला हा मारहाणीचा प्रकार पाहून लोकांनी व्हिडीओ शूट केला. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप गेल्याचं वृत्त समोर आलं आहे.

 

First published:

Tags: Divorce, Shocking viral video, Wife and husband