Home /News /viral /

अर्रsss! नवरीबाईला वरमाला घालताच निसटली नवरदेवाची पँट; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO

अर्रsss! नवरीबाईला वरमाला घालताच निसटली नवरदेवाची पँट; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO

भरमंडपात नवरदेवाची पँट निसटली पण त्याला समजलंही नाही. नवरीबाईलाही हसू आवरलं नाही.

  मुंबई, 27 मे : लग्न म्हणजे मजामस्ती धम्माल आली. तसं लग्नात सर्वकाही प्लॅन करून केलं जातं. पण काही वेळा असं काही अचानक घडतं ज्याचा आपण विचारही केलेला नसतो (Funny Wedding Video). अशाच लग्नाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात ऐन लग्नात नवरदेवाची पँट निसटली आहे  (Groom’s Trouser Pant Fall during Jaimala in wedding). भऱमंडपात नवरदेव Oops moment चा शिकार झाला. पण हा व्हिडीओ पाहून तुम्ही मात्र पोट धरून हसाल. नवरीबाईला जयमाला घालतानाच नवरदेवासोबत नको ती घटना घडली. व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी स्टेजवर एकमेकांसमोर उभे आहे. वरमालाची विधी सुरू आहे. दोघंही एकमेकांना वरमाला घालतात. आधी वधू वराला वरमाला घालते. त्यानंतर वर वधूला वरमाला घालतो. पण त्याचवेळी नवरदेवासोबत असं काही घडतं ज्याचा कुणी विचारही केला नसेल. नवरीबाईला वरमाला घालताच नवरदेवाची पँट निसटते. आश्चर्य म्हणजे आपली पँट निघाली आहे, हे त्यालाही समजत नाही. वरमाला घातल्यानंतर तो किती तरी वेळ तसाच उभा राहतो. समोर असलेल्या नवरीबाईचं लक्ष मात्र त्याच्याकडे असते. नवऱ्याची निसटलेली पँट पाहून तिलाही हसू येत असतं. ती मान खाली घालून हसत असते. इतक्यात नवरदेवाच्याही लक्षात येतं की आपली पँट निसटली आहे. हे वाचा - नवरदेवाच्या मित्रांचं गिफ्ट पाहून भडकली नवरी, पाहताच क्षणी फेकून दिलं; असं काय होतं पाहा VIDEO तो लगेच खाली वाकट आपली पँट वर करतो. पण त्यालाही हसू आवरत नाही. त्यानंतर गालातल्या गालात हसणारी नवरीही मोठमोठ्याने खळखळून हसू लागते. नवरा-नवरी त्यांचे नातेवाईक आणि लग्नात उपस्थित सर्व पाहुणे मंडळी हसू लागतात. मंडपात एकच हशा पिकतो.
  View this post on Instagram

  A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)

  @bhutni_ke_memes इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा. हे वाचा - अजबच! इथे कार्यक्रमात उशिरा पोहोचणाऱ्यांना मिळतो विशेष आदर; लवकर पोहोचलात तर खैर नाही याआधीही एका नवरदेवाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात वरातीमध्ये नवरदेवाची पँट फाटली होती. @ghantaa इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला.
  नवरदेव आपल्या नवरीला आणण्यासाठी निघला होता. जसा तो घोडीवर चढायला गेला तशी त्याची पँट टर्रकन फाटली. त्यानंतर तो मोठमोठ्याने ओरडून आपल्यासाठी दुसरी पँटही मागताना दिसला.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Funny video, Viral, Viral videos, Wedding, Wedding video

  पुढील बातम्या