Home /News /viral /

नवरदेवाच्या मित्रांचं गिफ्ट पाहून भडकली नवरी, पाहताच क्षणी फेकून दिलं; असं काय होतं पाहा VIDEO

नवरदेवाच्या मित्रांचं गिफ्ट पाहून भडकली नवरी, पाहताच क्षणी फेकून दिलं; असं काय होतं पाहा VIDEO

नवरदेवाच्या मित्रांनी नवरीबाईला असं गिफ्ट दिलं की पाहताच तिचा गुलाबी चेहरा रागाने लालबुंद झाला.

    मुंबई, 26 मे : लग्न म्हटलं की गिफ्ट आलंच आणि लग्नात आपण दिलेलं गिफ्ट युनिक आणि हटके असावं असा प्रयत्न काही जणांचा असतो (Wedding video). विशेषतः नवरा-नवरीचे मित्रमैत्रिणी तर त्यांना इतके विचित्र गिफ्ट देतात ज्याचा आपण विचारही करू शकत नाही (Wedding gift video). असे व्हिडीओही तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. पण मजा म्हणून देण्यात आलेले असे गिफ्ट पाहून नवरा-नवरीलाही हसू आवरत नाही. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिीडओत मात्र नवरीबाई असं विचित्र गिफ्ट पाहून चांगलीच तापली (Angry Bride Video). नवरदेवाच्या मित्रांनी नवरीबाईला लग्नाचं असं गिफ्ट दिलं की नवरी की तिच्या चेहऱ्यावर हसू फुलण्याऐवजी तो रागाने लालबुंद झाला. गिफ्ट पाहताच ती इतकी भडकली की दुसऱ्याच क्षणी तिथल्या तिथेच तिने ते गिफ्ट सर्वांसमोर फेकून दिलं (Angry Bride Throw Gift Video) आणि नवरदेवाच्या मित्रांकडे रागाने पाहू लागली. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की असं या नवरीबाईला गिफ्ट म्हणून दिलं तरी काय की त्यामुळे तिने ते रागात फेकून दिलं? हे वाचा - VIDEO - फक्त सफरचंदांना बोट लावून हिरो बनले आजोबा; झाला World Record व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी दोघं स्टेजवर एकमेकांशेजारी बसले आहेत. नवरदेवाच्या मित्रांनी नवरीच्या हातात एक गिफ्ट दिलं आहे. नवरी ते गिफ्ट खोलते. नवरदेवालाही गिफ्ट काय आहे याची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे नवरी गिफ्ट खोलताना तोसुद्धा पाहत असतो, त्याच्या चेहऱ्यावर हसूही असतं. नवरीबाई गिफ्टचं रॅपर उघडते आणि ती शॉक होते. गिफ्ट उघडताच ते पाहून तिचा चेहरा रागाने लालबुंद होतो. त्याचवेळी नवरदेवाचे मित्रही मोठमोठ्याने ओरडू लागतात. त्यामुळे ती इतकी भडकते की सर्वांसमोर तिथंच स्टेजवर ते गिफ्ट फेकून देते. त्यानंतर नवरदेवाचा एक मित्र ते गिफ्ट उचलून पुन्हा नवरीला चिडवण्यासाठी म्हणून तिच्या मांडीवर ठेवतो आणि लगेच बाजूला करतो. हा एक बॉक्स दिसतो आहे. पण हा बॉक्स नेमका कशाचा आहे, ते मात्र या व्हिडीओत स्पष्टपणे दिसत नाही आहे. हे वाचा - SORRY...SORRY...SORRY... पडणार भारी, लिहिणाऱ्याला शोधतायेत पोलीस; नेमकं काय आहे प्रकरण पाहा करण कुमार नावाच्या युट्यूबरने आपल्या चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. काही युझर्सनी हे स्टुपिड गिफ्ट असल्याचं म्हणत नवरीने जे केलं ते योग्यच केल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी नवरीबाई रागिष्ट आणि घमेंडी म्हटलं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Bride, Bridegroom, Viral, Viral videos, Wedding video

    पुढील बातम्या