व्हिडिओमध्ये दिसतं की स्टेजवर नवरदेव आणि नवरी (Groom and Bride) एकमेकांना वरमाळा घालत आहेत. नवरदेवानं नवरीला वरमाळा घातली मात्र यानंतर असं काही झालं जे पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.
नवी दिल्ली 05 जुलै: आजकाल सोशल मीडियावर लग्नसमारंभातील (Wedding Videos on Social Media) अनेक मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतात. हे व्हिडिओ लोकांच्या भलतेच पसंतीसही पडतात आणि लोक यावर भरपूर कमेंटही करतात. कित्येक व्हिडिओ तर असे असतात ज्याला लाखो व्ह्यूज मिळतात आणि लोक सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हे व्हिडिओ शेअरही करतात. लग्नाचा एक असाच व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
अनेकदा लग्नसमारंभादरम्यान तुम्हाला अशी काही दृश्य पाहायला मिळतात जी पाहून हसू आवरणं अवघड होऊन जातं. बऱ्याचदा तर नवरदेव आणि नवरीच असं काहीतरी करतात की सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतात. आता व्हायरल झालेला व्हिडिओदेखील (Funny Video of Groom) काहीसा असाच आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं की स्टेजवर नवरदेव आणि नवरी (Groom and Bride) एकमेकांना वरमाळा घालत आहेत. नवरदेवानं नवरीला वरमाळा घातली मात्र यानंतर असं काही झालं जे पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.
उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग; हा VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल 'इतकी कसली घाई'?
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरदेव आणि नवरी एकमेकांना वरमाळा घालताना दिसत आहेत. आधी नवरीबाई नवरदेवाला वरमाळा घालते. यानंतर नवरदेव नवरीला वरमाळा घालू लागताच त्याचा पायजमा निसटतो आणि खालू येऊ लागतो. हे सर्व दृश्य पाहून नवरीलाही हसू आवरत नाही.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. याच कारणामुळे अनेक यूजर्सनं यावर आपली प्रतिक्रियाही दिली आहे. एका यूजरनं म्हटलं, की हे दृश्य इतकं मजेशीर आहे की हे पाहून मी खूप हसलो. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की लग्नाचा असा व्हिडिओ मी पहिल्यांदाच पाहिला. इतर अनेक यूजर्सनं व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यात हातात शस्त्र घेऊन फिरणाऱ्या गुंडांची दहशत; काळजाचा थरकाप उडविणारा VIDEO
हा व्हिडिओ तुम्हालाही नक्कीच आवडला असेल. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ ‘official_niranjanm87’ नावाच्या यूजरनं शेअर केला आहे. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.