जाहिरात
मराठी बातम्या / Viral / सर्वांसमोरच हातात हात धरला आणि दिराच्या लग्नात वहिनीचा धिंगाणा; पाहा VIDEO

सर्वांसमोरच हातात हात धरला आणि दिराच्या लग्नात वहिनीचा धिंगाणा; पाहा VIDEO

सर्वांसमोरच हातात हात धरला आणि दिराच्या लग्नात वहिनीचा धिंगाणा; पाहा VIDEO

दिराच्या लग्नात वहिनीचा उत्साह पाहून सर्वजण थक्क झाले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 सप्टेंबर : दिर आणि वहिनीतील (Devar Bhabhi) नातं हे प्रेम, आदर आणि मैत्रीचं असतं. त्यांच्यातील बाँडिंग एकदम भारी असतं. दिर म्हणजे वहिनीसाठी (Devar Bhabhi video) मित्र, भाऊ आणि लेकही असतो. त्यामुळेच कोणत्याही तरुणाच्या लग्नाचा (Wedding video) आनंद जितका त्याच्या आईला असतो तितकाच त्याच्या वहिनीला असतो (Devar Bhabhi dance video). दिराच्या (Brother in law) लग्नामुळे आनंदी झालेल्या अशाच एका वहिनीने (Sister in law) दिराच्या लग्नात धिंगाणा घातला आहे (Wedding dance video). एका लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात दिराच्या लग्नात वहिनी जबरदस्त डान्स करताना दिसली. वहिनीने दिराच्या लग्नात ठुमके लगावले आहेत. डोक्यावर पदर घेऊन, दिराचा हात हातात धरून वहिनी नाचताना दिसली.

जाहिरात

दिराच्या लग्नात वहिनी सर्व गोष्टीत पुढाकार घेते. मग ती लग्नाची तयारी असो, लग्नाचे कार्यक्रम असो, लग्नाती विधी-परंपरा असो किंवा लग्नातील डान्स असो. अगदी कशातच ती मागे राहत नाही. हे वाचा -  हसणं दूर ही नवरी लग्नात आपलं तोंडही उघडू शकत नाही; कारण वाचून व्हाल हैराण व्हिडीओत पाहू शकता नवरदेवाची लग्नाची वरात निघाली आहे. आपल्या दिराला लग्नाच्या ड्रेसमध्ये पाहून, त्याला नवरदेव झालेला पाहून आणि त्याची वरात निघताना पाहून वहिनीचा आनंद गगनात मावेनासाच झाला आहे. वहिनी इतकी उत्साही आहे ही थेट डान्स करायलाच सुरुवात करते. हम आपके है कौन फिल्ममधील लो चली मै अपनी देवर की बारात लेके, या गाण्यावर तिने जबरदस्त ठुमके लगावले आहेत. तिला पाहून आजूबाजूला असलेले नातेवाईकही थक्क झाले आहे. वहिनी सुरुवातीला एकटीच नाचते पण नंतर ती दिरालासुद्धा आपल्यासोबत नाचायला लावते. दिराच्या हातात हात टाकते आणि त्याच्यासोबत नाचते. वहिनीला आनंदी पाहून दिराच्या चेहऱ्यावरही हसू फुललं आहे. वहिनीने जेव्हा नाचायला सोबत घेतलं तेव्हा दिरसुद्धा जोशात नाचू लागला. हे वाचा -  नवरीसाठी स्टेजरवरच केलं हे काम; नवरदेवानं जिंकली सगळ्यांची मनं, पाहा खास Wedding Video या दिर-वहिनाचा हा सुंदर असा व्हिडीओ  rajputana_style_21  इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात