जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पाठवणीवेळी नवरी नाही, तर नवरदेवच ढसाढसा रडू लागला; VIDEO पाहून समजेल कारण

पाठवणीवेळी नवरी नाही, तर नवरदेवच ढसाढसा रडू लागला; VIDEO पाहून समजेल कारण

पाठवणीवेळी नवरी नाही, तर नवरदेवच ढसाढसा रडू लागला; VIDEO पाहून समजेल कारण

व्हायरल झालेल्या व्हिडिओतील सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे नववधू तिच्या निरोपाच्या वेळी रडत नाही. मात्र नवरदेवच रडताना दिसतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 09 मे : भारतात सध्या लग्नसराईचा सीझन (Wedding Season 2022) सुरू आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये प्रचलित असलेल्या विविध प्रथांमध्ये एक गोष्ट सामान्य आहे ती म्हणजे नवरीची पाठवणी. अनेकदा आपण विवाहसोहळ्यांमध्ये पाहतो की लग्नानंतर निरोप घेताना केवळ नवरीच नाही तर तिचे कुटुंबीयही खूप भावूक होतात. असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये नववधू भावुक होऊन सासरच्या घरी जाण्यास नकार देते, पण घरातील लोक तिला समजावून नवरदेवासोबत सासरी पाठवतात. सध्या नवरीच्या पाठवणीचा एक अनोखा व्हिडिओ (Funny Wedding Video) समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. जिममध्ये नाही तर घरीच प्लास्टिकच्या खुर्चीवर बसून उचललं वजन; अतिआत्मविश्वास पडला महागात, VIDEO व्हायरल झालेल्या व्हिडिओतील सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे नववधू तिच्या निरोपाच्या वेळी रडत नाही. मात्र नवरदेवच रडताना दिसतो. हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या सगळ्याच लोकांना आश्चर्य वाटलं की नवरदेव का रडत आहे?

जाहिरात

व्हिडिओच्या सुरुवातीला दिसतं की नवरदेव रडत आहे आणि त्याच्याशेजारी उभा असलेली वधू हसायला लागली आहे. नवरीच्या चेहऱ्यावर हास्य कायम असतं, तर नवरदेव रडतच बाहेर येतो. काही सेकंद हा व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेल की नवरदेव रडण्याचं नाटक करत होता. Wedding Video: गुरुजी बोलावत राहिले…नवरदेव वाट पाहत राहिला; नवरी मात्र भर मंडपात निवांत नववधू हसत असताना नवरदेव मात्र रडण्याचं नाटक करत राहातो. वधू-वराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे सासरी जाताना नवरीच्या चेहऱ्यावर अजिबातही दुःख किंवा भीती दिसत नाही. ती अगदी आनंदात आपल्या सासरी निघाल्याचं दिसतं. divyvermamakeupartist नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केला गेला आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीसही उतरत आहे. व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं की, ‘आयुष्यभरासाठी झटका बसला’. अनेक युजर्सनीही या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट करून प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात