Home /News /lifestyle /

मांजराला वाचवण्यासाठी तरुणाची धडपड, तोंडात तोंड टाकून आपला श्वासही दिला अखेर...; VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल

मांजराला वाचवण्यासाठी तरुणाची धडपड, तोंडात तोंड टाकून आपला श्वासही दिला अखेर...; VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल

आगीच्या विळख्यातून बाहेर काढल्यानंतर मांजराला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचा जवान तब्बल 30 मिनिटं धडपड करत होता.

    क्वालालांपूर, 27 जानेवारी : सोशल मीडियावर बचाव, रेस्क्यूचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. माणसांचा जीव वाचवण्यासाठी धडपणारी माणसं तुम्ही पाहिली असतील. पण मुक्या जीवांना वाचवणारे तसे क्वचितच पाहायला मिळतात. सध्या अशाच एका मांजराच्या बचावाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही (Man give cpr to cat by mouth). एका तरुणाने मांजराचा जीव वाचण्यासाठी इतकी धडपड केली आहे की ती पाहून डोळे दाटून येतात. आगीतून एक मांजराला बाहेर काढल्यानंतर तिच्यात पुन्हा जीव आणण्यासाठी या तरुणाने शक्य ते सर्व प्रयत्न केले. अगदी तिच्या तोंडात तोंड घालून आपला श्वासही दिला. हा  मलेशियाच्या मिरीमधील ही घटना आहे. हे वाचा - वादळाला कॅमेऱ्यात कैद करताना ते घोंगावत तिच्याजवळच आलं आणि...; खरतनाक LIVE VIDEO एका बिल्डिंगमध्ये आग लागली होती. या आगीत हे मांजराचं पिल्लू अडकलं होतं. त्याला सुरक्षितरित्या बाहेर काढलं पण त्याच्यामध्ये कोणतीच हालताल होत नव्हती. जवळजवळ मरणाच्या दारातच होतं. त्यावेळी अग्निशमन दलाचा जवान पीबी मोहम्मद एनलीने त्याला आपल्या हातात घेतलं. त्याने मागचापुढचा कोणताही विचार न करता मांजराला आपल्या तोंडाने सीपीआर द्यायला सुरुवात केली. मांजराच्या तोंडात आपलं तोंड टाकलं आणि आपला श्वास त्याच्यामध्ये फुंकला. तोंडाने त्याला ऑक्सिजन दिला, त्यानंतर त्याच्या छातीवर दाब दिला. तब्बल 30 मिनिटं त्याची अशीच धडपड सुरू होती. पण मांजराच्या फुफ्फुसात आगीचा धूर इतका गेला होता की तिचा मृत्यू झाला. इतक्या प्रयत्नानंतरही तो तिला वाचवू शकला नाही. हे वाचा - डोक्याची शस्त्रक्रिया झालेल्या लेकीला धीर देण्यासाठी वडिलांनी केलं असं काही.... Jabatan Bomba dan Penyelamat Malaysia Negeri Sarawak  नावाच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या या जवानाने मुक्या जीवाला वाचण्यासाठी शेवटपर्यंत आपले प्रयत्न सुरू ठेवले. त्यासाठी त्याचं कौतुक केलं जातं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Cat, Pet animal, Viral, Viral videos

    पुढील बातम्या