मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मित्रांचा प्रताप अन् नवरदेवाला नवरीबाईसमोर झुकवावी लागली मान; नेमकं काय घडलं पाहा VIDEO

मित्रांचा प्रताप अन् नवरदेवाला नवरीबाईसमोर झुकवावी लागली मान; नेमकं काय घडलं पाहा VIDEO

मित्रांचं ते कृत्य पाहून नवरदेवालाही वाटली लाज.

मित्रांचं ते कृत्य पाहून नवरदेवालाही वाटली लाज.

मित्रांचं ते कृत्य पाहून नवरदेवालाही वाटली लाज.

  मुंबई, 24 डिसेंबर : लग्न (Wedding video) म्हटलं की नवरा-नवरीचे (Bride groom video) मित्रमैत्रिणी त्यांची मस्करी करण्याची एक संधी सोडत नाही. लग्नातील अशाच एका मजा-मस्तीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात नवरदेवाचे मित्र त्याच्यासोबत नको तो प्रताप करायला गेले. अखेर नवरदेवाला नवरीबाईसमोरच मान झुकवावी लागली. नवरदेवाचं हे कृत्य पाहून सर्वजण थक्क झाले. लग्नात वरमाला घालण्याचा विधी सुरू होता. त्याचवेळी नवरदेवाच्या मित्रांनी स्टेजवर येत नवरदेवासोबत कारनामा करायला गेला. खरंतर ते नवरदेवासोबत नाही तर  नवरीबाईसोबत मस्ती करायला आले होते. जे नवरदेवाला बिलकुल आवडलं नाही. त्याने ऑन द स्पॉट आपल्या मित्रांच्या प्लॅनची ऐशीतैशी केली. नवरीसमोर असं काही घडलेलं पाहून त्यालाही थोडी लाज वाटली आणि त्याने तिच्यासमोर लगेच आपली मान झुकवली. हे वाचा - कारमध्ये झोपलेल्या नवरीसोबत असं काही केलं की...; नवरदेवाचा प्रताप कॅमेऱ्यात कैद आता इतकं असं या लग्नात घडलं तरी हे काय हे जाणून घेण्याची, पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. तर व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी एकमेकांसमोर हातात वरमाला घेऊन उभे आहेत. नवरी नवरदेवाला वरमाला घालायला जाते. ती वरमाला घालणार इतक्यात वराच्या मागून त्याचे मित्र येतात आणि त्याला उचलण्याचा प्रयत्न करतात.
  तुम्हाला माहिती असेल हल्ली बऱ्याच लग्नात वरमाला घालताना नवरा-नवरीला त्यांचे मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक वर उचलून धरतात आणि मग त्या दोघांमध्ये वरमाला घालण्याची स्पर्धाच रंगते. तसंच काहीसं या नवरदेवाचे मित्र करायला गेले. पण नवरदेवाने मात्र तसं बिलकुल होऊ दिलं नाही. त्याने आपल्या नवरीबाईला बिलकुल त्रास दिला नाही. उंच जाऊन नवरीला वरमाला घालताना खटाटोप करायला लावण्यापेक्षा तो स्वतःच तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. आपली मान तिच्यासमोर झुकवली आणि मग नवरीबाईने आपल्या नवरदेवाला वरमाला घातली. हे वाचा - अजब हट्ट! पुरामुळे खराब झाला लग्नाचा अल्बम, आता फोटोसाठी करायचंय दुसरं लग्न नवरदेवाचं हे कृत्य पाहून त्याचे मित्रही सरप्राइझ झाले. अन् त्यांनी हसत हसत टाळ्या वाजवत नवरदेवाने जे केलं त्याला दाद दिली.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Bridegroom, Viral, Wedding, Wedding video

  पुढील बातम्या