क्वालालंपूर, 24 डिसेंबर: आपल्या लग्नाचा अल्बम (Wedding Album) खराब झाल्यामुळे एक महिला इतकी (Female unhappy) नाराज झाली आहे की तिला आता दुसरं लग्न (Second Marriage) करण्याची इच्छा आहे. पुराच्या पाण्यात (Flood water) लग्नाचा अल्बम भिजला आणि तो खराब झाल्याचं ही महिला सांगते. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय सोहळा असतो. या सोहळ्यातील क्षणन् क्षण प्रत्येकाच्या लक्षात राहतो आणि ते क्षण आयुष्यभर जपले जातात ते लग्नाच्या अल्बममधून. मात्र हा अल्बमच आता भिजल्यामुळे निराश झालेल्या महिलेनं दुसऱ्या लग्नाची तयारी सुरू केली आहे.
अल्बममध्ये होता जीव
मलेशियात नुकताच भीषण पूर आला होता. काही भागातील जनजीवन उद्ध्वस्त झालं होतं. एका पूरग्रस्त भागात घेण्यात आलेल्या मुलाखतींमधील एका मुलाखतीदरम्यान महिलेनं ही अजब इच्छा व्यक्त केली आहे. आपलं लग्न हा आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग होता. आपल्याला हा प्रसंग फोटो अल्बमच्या माध्यमातून टिकवता येत होता. मात्र आता त्या आठवणीच निघून जाणार असतील, तर जगण्यात मजा नाही, असं या महिलेला वाटत आहे.
"Habis gambar kahwin, kita mana boleh kahwin lagi sekali. Dah 20 tahun kahwin, sekali je kahwin"
Sis 😂😂😂😂😂 hahaha adoi pic.twitter.com/ZCFMVzBn4P — Aiyuri (@aiyuri_tissi) December 23, 2021
पतीने दिला नकार
महिलेला दुसरं लग्न करायचं आहे, याचा अर्थ पती सोडून दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करायचं आहे, असा मात्र बिलकूल नव्हे. तिला आपल्याच पतीसोबत पुन्हा एकदा लग्न करण्याची इच्छा आहे. मात्र पतीला ही कल्पना पसंत नसल्यामुळे त्याने पुन्हा एकदा लग्न करायला साफ नकार दिला आहे. त्यामुळे ही महिला काहीशी नाराज असून आपण आपल्या पतीला समजावण्याचा आणि त्याला यासाठी तयार करण्याचा प्रयत्न करू, असं तिनं म्हटलं आहे.
हे वाचा - आईला त्रास देणाऱ्या मुलाला कुत्र्याने शिकवला धडा; VIDEO होतोय व्हायरल
व्हिडिओ होतोय व्हायरल
पुरासारख्या मोठ्या संकटाचा सामना करूनही महिलेची विनोदबुद्धी कायम असल्याचं सर्वांनाच कौतुक वाटत आहे. ज्या प्रकारे ही महिला आपली मागणी मांडत आहे, ती स्टाईल सर्वांनाच हसायला भाग पाडणारी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marriage, Video viral