व्हिडीओत पाहू शकता. नवरा-नवरी एकमेकांसमोर उभे आहेत. नवरीला एकदा पाहताच नवरदेव तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. त्यानंतर छातीवर हात ठेवतो आणि तितक्यात त्याचा तोल ढासळतो. त्याच्या बाजूलाचा असलेले मित्र त्याला सावरतात. नाहीतर तो स्टेजवरच कोसळला असता. आता नवरदेवाला काही झालेलं नाही किंवा त्याला चक्कर वगैरे आलेली नाही. तर तो नाटक करतो आहे. नवरीला पाहताच त्याने हटके पद्धतीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हे वाचा - VIDEO - नवरीचे नखरे पाहून नवऱ्याची सटकली; भरमांडवात जे केलं ते पाहून वऱ्हाडी शॉक गुलाबी लेहंग्यात नटूनथटून नवरी समोर येताच नवरदेव तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. तिला पाहून त्याला धक्काच बसतो. नवरी इतकी सुंदर दिसत (Most Beautiful Bride) असते की तिच्या सौंदर्याबाबत बोलायला नवऱ्याकडे शब्दच नाही. न बोलताच नवरदेव मग अशा पद्धतीने तिच्या सौंदर्याचं कौतुक करतो. तिच्या सौंदर्याने आपल्याला घायाळ केलं, असंच त्याला सांगायचं आहे. नवऱ्याला असं करताना पाहून नवरीसुद्धा लाजते आणि हसते. त्यावेळी तिच्या चेहराही गुलाबी झाल्याचा दिसतो. हे वाचा - करवल्यांऐवजी वराच्या मित्राने लुटली लग्नाची मजा; असं काही केलं की नजर हटणार नाही दुल्हनिया इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Wedding video