मुंबई, 13 जुलै : लग्न (Wedding) म्हटलं नवरा-नवरीशिवाय सर्वात जास्त चर्चा असते ती करवल्यांची. पण सध्या अशा लग्नाचा (Wedding Video) व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे, ज्याच करवल्या नाही तर नवरदेवाचा मित्रच (Groom's friend) चर्चेत आहे. मित्राच्या लग्नात मित्राने चांगलीच मजा केली आहे. स्टेजवर नवरा-नवरीच्या मागे राहून वराच्या मित्राने असं काही केलं आहे की, त्यावरून कुणाचीच नजर हटत नाही.
लग्नात नवरा-नवरीकडेच सर्वांचं लक्ष असतं. पण या व्हिडीओत तुमचं लक्ष नवरा-नवरी नाही तर थेट त्यांच्यामागे असलेल्या मित्राकडेच जाईल. या मित्राने नवरा-नवरीच्या मागे राहून जे केलं ते पाहून सर्वजण शॉक झाले आहेत.
View this post on Instagram
आपल्या मित्राचं लग्न होणार याचा आनंद प्रत्येक मित्राला असतो. प्रत्येक जण तो वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करतो. पण कदाचित या मित्राने जसा आनंद व्यक्त केला असेल तसा क्वचितच कोणत्या तरी मित्राने व्यक्त केला असेल. नवरदेवाच्या या मित्राने नवरा-नवरीवर अख्खं नोटांचं बंडल उडवलं आहे.
हे वाचा - नवरीचा हात हातात धरताच थरथर कापू लागला; लग्नाआधीच नवरदेवाची काय झाली अवस्था पाहा
व्हिडीओत पाहू शकता, नवरा-नवरीच्या मागे दोन तरुण उभे आहेत. त्यातील एका तरुणाच्या हातात नोटा आहेत. एकेएके करत तो नोटा धडाधड नवरा-नवरीवर उडवत जातो. त्यानंतर आजूबाजूचे लोकही पाहत राहतात. खूप वेळ हा तरुण असेच पैसे उडवत राहतो हातातील पैसे संपल्यानंतर तो स्टेजवरून खाली उतरतो. त्यानंतर आणखी एक दुसरा तरुणही नोटा उडवायला येतो. तो मात्र दोन नोटा हवेत उडवतो आणि बाकीच्या नोटा पुन्हा आपल्या खिशात टाकतो.
हे वाचा - नवरी जोमात, वऱ्हाडी कोमात; थेट स्कॉर्पिओच्या बोनेटवर बसून मंडपात एंट्री, पण...
हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. मित्राचं लग्न असावं तर असं किंवा मित्र असावा तर असा, अशाच काहीशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Viral, Wedding, Wedding video