नवी दिल्ली 10 ऑगस्ट : तुम्ही घरामध्ये किंवा बाहेरही अनेकांना असं म्हणाताना ऐकलं असेल, की लग्नानंतर नवरी आणि नवरदेवाचं नातं सात जन्मासाठी बांधलं जातं. याच कारणामुळे लग्नात सात फेरे घेताना पंडीतही प्रत्येक फेऱ्याला मंत्राचा अर्थ सांगतात. लग्नाच्या मंडपात फेरे घेताना नवरी आणि नवरदेव (Bride and Groom) एकमेकांसोबत मजबूत धाग्यानं बांधले जातात. सध्या लग्नातील सात फेऱ्यांचा असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Wedding Video) होत आहे.
VIDEO : वडिलांनीच फुग्यासह मुलीला हवेत सोडलं; पाहूनच चुकला आईच्या हृदयाचा ठोका
सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की लग्नातील इतर सर्व कार्यक्रम प्रथेनुसार पार पडल्यानंतर नवरी आणि नवरदेव सात फेरे घेण्यासाठी उभा राहतात. मात्र, हे फेरे घेत असताना नवरदेव जे करतो, ते पाहून नेटकरीही फिदा झाले आहेत. फेरे घेत असताना नवरी समोर चाललेली असते. मात्र, लग्नात मोठा लेहंगा घातल्यानं ती मागे वळून पाहू शकत नाही. इतक्यात नवरीचा लेहंगा आगीकडे जाऊ लागतो. हे पाहताच नवरीच्या मागे चालणारा नवरदेव लगेचच आपल्या हातांनी लेहंगा बाजूला घेतो.
View this post on Instagram
फणा VS पंजा; मांजर आणि सापातील जबरदस्त फायटिंगचा थरार; पाहा VIDEO
फेरे घेतानाच नवरदेवानं नवरीसाठी केलेलं हे काम पाहून नेटकरीही इम्प्रेस झालेत. नवरीला काही त्रास होऊ नये यासाठी नवरदेवानं स्वतः आपल्या हातांनी तिचा लेहंगा बाजूला घेतला. इन्स्टाग्रामवर कपल गोलद्वारे हा व्हिडिओ अपलोड होताच 4 लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं, ड्रीम. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत..
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Video viral, Wedding video