जाहिरात
मराठी बातम्या / Viral / नवरी हार घेऊन उभा होती अन् मंडपातून फरार झाला नवरदेव, कारण ऐकून सरकली पायाखालची जमीन

नवरी हार घेऊन उभा होती अन् मंडपातून फरार झाला नवरदेव, कारण ऐकून सरकली पायाखालची जमीन

ऐनवेळी नवरदेव फरार (प्रतिकात्मक फोटो)

ऐनवेळी नवरदेव फरार (प्रतिकात्मक फोटो)

वधू वरमाला हातात घेऊन स्टेजवर थांबली होती, पण नवरदेव परत आलाच नाही. बराच वेळ वाट बघूनही नवरदेव स्टेजवर न पोहोचल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली.

  • -MIN READ Madhya Pradesh
  • Last Updated :

भोपाळ 25 जून : लग्नाच्याच दिवशी ऐनवेळी एका लग्नात मोठा गोंधळ उडाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. या घटनेत झालं असं की लग्नाची तयारी पूर्ण झाली होती, वरातही पोहोचली होती. वरमालेचा कार्यक्रम सुरू होणार होता. मात्र अचानक नवरदेव दुचाकी घेऊन पळून गेल्याचं समोर आलं. यानंतर एवढा गोंधळ झाला की पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. सरतेशेवटी असा निर्णय घेतला गेला ज्याचा कदाचित कोणीही विचार केला नसेल. ही घटना मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिल्ह्यातील मसुरिहा गावात राहणाऱ्या रवेंद्र गुप्ता याचं लग्न कोठार गावातील रहिवासी ज्योती गुप्तासोबत ठरलं होतं आणि काही दिवसांपूर्वी टिळ्याचा कार्यक्रमही झाला होता. गुरुवारी लग्न होतं. त्यामुळे वरात सिधी शहरातील शक्ती पॅलेसमध्ये पोहोचली. लग्नाच्या दिवशीचे बरेच विधीही झाले होते, वरमालेचा कार्यक्रम सुरू होणार होता. अजब प्रकरण! फेरे घेताना मंडपातच पडला नवरदेव; नवरीने तिथेच लग्न मोडलं, काय घडलं? कार्यक्रम सुरू होताच नवरदेव गायब असल्याची माहिती मिळाली. वधू वरमाला हातात घेऊन स्टेजवर थांबली होती, पण नवरदेव परत आलाच नाही. बराच वेळ वाट बघूनही नवरदेव स्टेजवर न पोहोचल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली. त्यानंतर तो दुचाकीसह पळून गेल्याचं उघड झालं. शेवटी हातातील हार ठेऊन निराश झालेल्या नववधूला मंडपातून स्टेजवरुन यावं लागलं. त्यानंतर दोन्ही बाजूकडील लोकांमध्ये वादावादी सुरू झाली. वधूच्या नातेवाइकांनी आरोप केला आहे की, नवरदेवाने एका मुलीसोबत कोर्ट मॅरेज केलं आहे. मात्र हे न सांगताच तो दुसरं लग्न लावण्यासाठी आला होता. हे ऐकताच मंडपातच हाणामारी सुरू झाली. मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, ‘लग्न ठरल्यापासून आत्तापर्यंत सर्व खर्च मीच केला आहे. टिळ्याच्या कार्यक्रमालाही हॉटेल बुक केलं होतं. आता त्याचे पैसे मला परत मिळावे.’ माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन्ही पक्षांना समजावलं. पोलिसांनी सांगितलं की नवरीच्या बाजूकडील लोकांनी 6 लाख 50 हजार रुपये खर्च केले आहेत आणि वराच्या घरच्यांनी हे पैसे त्यांना परत करावे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात