जाहिरात
मराठी बातम्या / Viral / विधीदरम्यानच टॉयलेटला गेलेला नवरदेव; पण पुढे असं काही घडलं की मंडपातच ढसाढसा रडू लागली नवरी

विधीदरम्यानच टॉयलेटला गेलेला नवरदेव; पण पुढे असं काही घडलं की मंडपातच ढसाढसा रडू लागली नवरी

मंडपातून पळाला नवरदेव (प्रतिकात्मक फोटो)

मंडपातून पळाला नवरदेव (प्रतिकात्मक फोटो)

सर्व काही सुरळीत चाललं होतं आणि लग्नाचे विधी सर्व नियमांनुसार चालू होते. इतक्यात अचानक नवरदेवाने सांगितलं की, त्याला शौचालयाला जावं लागेल.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ 29 जून : लग्नात अनेकदा अशा काही विचित्र घटना घडतात, ज्या सगळ्यांनाच हैराण करतात. असंच एक प्रकरण आता समोर आलं आहे. उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये एक नवरदेव लग्न सुरू असतानाच टॉयलेटला जात असल्याचा बहाणा करून पळून गेल्याची घटना घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फतेहपूर जसोदा गावातील मूळ रहिवासी असलेल्या एका तरुणाचं लग्न गुरसहायगंज येथील एका मुलीसोबत ठरलं होतं. वृत्तानुसार, 23 जून (शुक्रवार) रोजी होणार्‍या कन्नौज येथील सामूहिक विवाह सोहळ्यात त्यांचं लग्न आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विवाह सोहळ्याची सर्व प्रक्रिया सुरुळित सुरू होती आणि लग्नासाठी अर्जही सादर करण्यात आला. नियोजित तारखेला वधू-वर दोघंही कुटुंबासह सामूहिक विवाह सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचले. सर्व काही सुरळीत चाललं होतं आणि लग्नाचे विधी सर्व नियमांनुसार चालू होते. लग्नात का चोरतात नवरदेवाचे बूट? रंजक आहे यामागचं कारण इतक्यात अचानक नवरदेवाने सांगितलं की, त्याला शौचालयाला जावं लागेल. लग्न सुरू असलेल्या गेस्ट हाऊसमधून बाहेर आल्यानंतर वराला लग्नाबाबत संशय आल्याने त्याने घटनास्थळावरून पळ काढला. काही वेळानंतरही नवरदेव न परतल्याने समारंभात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, वराच्या कुटुंबीयांनीही संधी साधून घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर वधूपक्षाने वराच्या कुटुंबीयांचाही शोध घेतला मात्र लग्नसमारंभानंतरही त्यांचा शोध लागला नाही. लग्नासाठी सजलेली वधू नवरदेवाच्या या कृत्यामुळे मंडपातच रडत राहिली. नंतर ती लग्न न करता निराश होऊन घरी परतली. नवरदेव का पळून गेला याची कोणालाच माहिती नव्हती. वधूच्या कुटुंबालाही खूप आश्चर्य वाटलं, कारण त्यांना या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात