मराठी बातम्या /बातम्या /Viral /...अन् नवरीबाईला सोडून लग्नमंडपातून नवरदेवाने काढला पळ; व्हायरल होतोय हा Wedding video

...अन् नवरीबाईला सोडून लग्नमंडपातून नवरदेवाने काढला पळ; व्हायरल होतोय हा Wedding video

लग्नमंडपात नेमकं असं काय घडलं की नवरदेव पळाला तुम्हीच पाहा.

लग्नमंडपात नेमकं असं काय घडलं की नवरदेव पळाला तुम्हीच पाहा.

लग्नमंडपात नेमकं असं काय घडलं की नवरदेव पळाला तुम्हीच पाहा.

मुंबई, 14 जानेवारी : लग्नमंडपातून नवरा किंवा नवरी (Bride groom video) पळाल्याचं तुम्ही फिल्ममध्ये पाहिलं असेल. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात नवरदेवाच्या मित्राने त्याला असं काही सांगितलं की नवरदेव लग्नमंडपच सोडून पळाला (Groom run away from Bride video) . लग्नाचा हा मजेशीर व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे (Wedding video).

लग्न म्हटलं की मजामस्ती आलीच आणि नवरदेवाचे मित्र तर यात कधीच मागे राहत नाही. वर-वधूला त्रास देण्याची एक संधी ते सोडत नाही. या लग्नातही जे काही घडलं त्यासाठी नवरदेवाचा मित्रच कारणीभूत आहे. त्याने नवरदेवाला असा इशारा केला ज्यामुळे नवरदेव भडकला आणि नवरीबाईला सोडून त्याने स्टेजवरून पळ काढला.

हे वाचा - GF च्या लग्नात BF ची एंट्री! नवरदेवासमोरच प्रपोज केलं; पुढे काय घडलं पाहा VIDEO

व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी एकमेकांसमोर उभे आहेत. दोघांच्याही हातात वरमाला आहेत. वरमाला घालण्याआधी नवरदेवाचं लक्ष त्याच्या मित्राकडे जाते. त्याचा मित्र त्याला काहीतरी इशारा करत असतो.

मित्राने इशारा करताच नवरदेव भडकतो आणि तो आपल्या हातातील वरमाला नवरीबाईच्या हातात ठेवतो. नवरीवर भडकत तो तिथून निघून जातो. नवरीला एकटं ठेवून स्टेजवरून पळ काढतो. त्याचा मित्र स्टेजच्या खालीच उभा असतो, त्याच्यासोबत तो पळताना दिसतो.

हे वाचा - VIDEO : डान्स करताना केलेली एक चूक भोवली; मंडपातच धाडकन कोसळले नवरी-नवरदेव

sanjusehrawatt  इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ म्हणजे एक प्रँक व्हिडीओ आहे. असे नवरा-नवरीचे बरेच प्रँक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये नवरदेवाचे मित्रमैत्रिणी त्याला असंच लग्नातून पळून जाण्यासाठी इशारे करत असतात. पण नवरदेव काही पळत नाही. पण या नवरदेवाने ती हिंमत केली. त्यामुळेच हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

First published:
top videos

    Tags: Bridegroom, Viral, Viral videos, Wedding, Wedding video