पणजी 09 एप्रिल : हुंड्याची आणखी एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे. यात नवरदेव आपल्या नववधूला विमानतळावरच सोडून पळून गेला. हुंडा न मिळाल्याने नवरदेवाच्या पालकांनी लग्न रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने हा सर्व प्रकार घडला. दोघांचं लग्न गोव्यात झालं, मात्र तिथून निघाल्यानंतर विमानतळावर पोहोचताच मोठी घटना घडली. नव्या गर्लफ्रेंडसोबत फिरायला गेलेला तरुण; इतक्यात समोर आली प्रेग्नंट प्रेयसी अन् झाली भलतीच फजिती खरं तर हे प्रकरण हरियाणातील एका डॉक्टर कुटुंबाशी संबंधित आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फरिदाबादमध्ये राहणाऱ्या या डॉक्टरच्या कुटुंबाने त्यांच्या मुलाचं लग्न हिसार येथील एका मुलीसोबत ठरवलं होतं. तरुण आणि तरुणीनेच एकमेकांना ऑनलाईन पसंत केलं होतं. मुलगा नेपाळमध्ये एमबीबीएसचा कोर्स करत आहे आणि त्याचा कोर्स संपल्यावर तो फरिदाबादला परत येऊन वडिलांचं हॉस्पिटल चालवणार आहे. याच दरम्यान त्याचं लग्न करण्यात आलं. मुलगी हिसारची रहिवासी होती. काही वेळापूर्वी लग्नाच्याच दिवशी मुलाच्या आई-वडिलांनी मुलीच्या कुटुंबीयांवर हुंड्यात बीएमडब्ल्यू न दिल्यास लग्न रद्द करू, असा दबाव आणल्याचं सांगण्यात आलं. कसंबसं मुलीला गोव्यातील लग्नाच्या ठिकाणी निरोप देण्यात आला, मात्र विमानतळावर पोहोचताच मुलाच्या पालकांनी मुलाला भडकवलं. एवढंच नाही तर आपल्या वाट्याचे पैसेही न भरताच त्यांनी लग्नस्थळ सोडलं.
विमानतळावर पोहोचताच वराने नवरीला सांगितलं की तू इथेच थांब, मी लगेच येतो. पण तो परत आलाच नाही. त्याने मोबाईलही बंद केला. यानंतर वधूकडून दागिन्यांनी भरलेली पिशवी हिसकावून वराच्या आईने पळ काढला. जेव्हा मुलीच्या कुटुंबीयांना हा सर्व प्रकार समजला तेव्हा त्यांना धक्काच बसला. सध्या त्यांनी फरिदाबादच्या सेक्टर-8 पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.