नवी दिल्ली 09 एप्रिल : अनेक वेळा माणसं ओळखण्यात आपण फसतो किंवा चुकतो. कटू सत्य समोर येईपर्यंत आपण ज्यांच्या जवळ आहोत त्यांचे वाईट हेतू आपल्याला समजू शकत नाही. असंच काहीसं घडलं लग्नाचं स्वप्न पाहणाऱ्या एका मुलीसोबत. ती टिंडरच्या माध्यमातून भेटलेल्या आपल्या प्रियकरासह लग्न आणि मुलांचं स्वप्न पाहात होती. मात्र हा तरुण दुसऱ्याच तरुणीच्या मुलाचा बाप होणार होता. पती कामासाठी परदेशात, पत्नीने 3 कोटींची लॉटरी जिंकली अन् थाटला दुसरा संसार मिररच्या रिपोर्टनुसार, मॅडलीन जाये नावाची तरुणी तिच्या बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक हॉलिडेवर होती. तिला माहित नव्हतं की तिला इथे असं काहीतरी पाहायला मिळेल, जे सहन करणंही कठीण होईल. ही संपूर्ण कथा जाणून घेतल्यानंतर तुमचाही टिंडरसारख्या डेटिंग अॅप्सवरील विश्वास कमी होईल. शेफिल्डच्या साउथ यॉर्कशायर येथील रहिवासी मॅडलीन टिंडरवर जेसन नावाच्या तरुणाला भेटली. त्याच्याशी एक महिन्याच्या संभाषणानंतर तिला वाटलं की लग्नासाठी यापेक्षा चांगला मुलगा दुसरा कोणी असूच शकत नाही. दोघेही एकमेकांसोबत भविष्याची स्वप्ने पाहायला लागले. तरुणीने मुलांच्या नावाचाही विचार केला होता आणि दोघांनीही सुट्टीत स्पेनमध्ये जाण्याचा प्लॅनही केला. 3 महिन्यांच्या नात्यानंतर ते इथे जाण्याच्या तयारीत होते, तेव्हाच एक अजब घटना घडली.
हे जोडपं सुट्टीसाठी विमानतळावर उतरताच एक गर्भवती महिला त्यांची वाट पाहत होती. तरुणीला तोपर्यंत काहीच समजलं नाही जोपर्यंत या गरोदर महिलेनं सांगितलं नाही की ती जेसनची गर्लफ्रेंड असून त्याच्या मुलाला जन्म देणार आहे. तिच्यासोबत तिचे आई-वडीलही होते. गर्भवती प्रेयसीने असंही सांगितलं की मुलाचे नाव जेसन नाही आणि तो 32 नाही तर 37 वर्षांचा आहे. इतकंच नाही तर त्याने गेल्या ४ वर्षात चार वेगवेगळ्या मुलींना डेट केलं आहे, ज्या त्याच्यापेक्षा खूप लहान होत्या. हे जाणून तरुणी हादरली अन् तिने परत कधीही डेटिंग अॅप न वापरण्याचा निर्णय घेतला.