मराठी बातम्या /बातम्या /Viral /प्रियकर वेळेत भेटायला न आल्याने रस्त्यावरच तरुणीचं धरणे आंदोलन; मग केलं असं काही की पोलिसांनाही फुटला घाम

प्रियकर वेळेत भेटायला न आल्याने रस्त्यावरच तरुणीचं धरणे आंदोलन; मग केलं असं काही की पोलिसांनाही फुटला घाम

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

प्रत्यक्षात ही तरुणी अनेक तास ओव्हरब्रिजवर तिच्या प्रियकराची वाट पाहत होती. कारण तिच्या प्रियकराने तिला तिथे भेटायला बोलावलं होतं, पण तो स्वतः वेळेवर पोहोचला नाही.

  • Local18
  • Last Updated :
  • Ranchi, India

रांची 13 मार्च : अनेकदा एखाद्याच्या प्रेमात पडल्यावर योग्य-अयोग्य यात फरक करणं खूप अवघड होऊन बसतं. त्यामुळे अनेकवेळा लोक अशी पावलं उचलतात, ज्याने आजूबाजूच्या लोकांना आणि प्रशासनालाही घाम फुटतो. झारखंडच्या चक्रधरपूरमध्ये अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे. जिथे एक मुलगी मुख्य रस्त्यावरील ओव्हर ब्रिजवर आपल्या प्रियकराची वाट पाहत धरणे आंदोलनाला बसली.

नवरीने मागितला हुंडा, नवरदेव मागणी पूर्ण न करू शकल्याने ऐनवेळी लग्नास नकार, काय आहे प्रकरण?

प्रत्यक्षात ही तरुणी अनेक तास ओव्हरब्रिजवर तिच्या प्रियकराची वाट पाहत होती. कारण तिच्या प्रियकराने तिला तिथे भेटायला बोलावलं होतं, पण तो स्वतः वेळेवर पोहोचला नाही. यामुळे तरुणी तिथेच धरण्यावर बसली. आजूबाजूच्या लोकांपासून ते प्रशासनापर्यंत सगळ्यांनी प्रयत्न करूनही या मुलीला तिथून हलवता आलं नाही.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी बरीच समजूत घातल्यानंतर तिला पोलीस ठाण्यात नेलं. तिथे तरुणीने ती चाईबासा येथील रहिवासी असल्याचं सांगितलं. चक्रधरपूरच्या टोकला पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी असलेल्या तिच्या प्रियकराने तिला पवन चौकात भेटण्यासाठी बोलावलं होतं. ती वेळेवर तिथे पोहोचली, पण तिचा प्रियकर आला नाही. त्याचा फोनही लागत नव्हता. तो वारंवार नेटवर्कच्या बाहेर असल्याचं सांगण्यात येत होतं. 2 तास प्रतीक्षा करूनही ती तिच्या प्रियकराशी बोलू शकली नाही, त्यानंतर ती पवन चौकातील ओव्हरब्रिजवर जाऊन बसली.

मुलगी आपल्या हट्टावर ठाम होती आणि तिथून हलायला तयार नव्हती. त्यामुळे ओव्हरब्रिजवर तमाशा सुरुच होता. काहीतरी घडण्याच्या भीतीने लोकांनी मुलीला खूप समजावलं, पण तिच्या जिद्दीपुढे तिने कोणाचंच ऐकलं नाही. अखेर तिथे दोन पोलिस तैनात करण्यात आले. जेणेकरून मुलीने कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये. अखेर समजावल्यानंतर तिला पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. तरुणीने प्रियकरावर कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. पोलीस तरुणाला बोलावून प्रकरण उकलण्याचा प्रयत्न करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Boyfriend, Viral news