नवी दिल्ली 29 एप्रिल : प्रत्येक मुलीला आपल्या लग्नात एक असा स्टायलिश वेडिंग ड्रेस (Wedding Dress) घालण्याची इच्छा असते, जो याआधी कोणीही परिधान केला नसेल. यासाठी फॅशन डिझायनर्सची सेवा घेण्यापासून बरंच काही प्लॅन केलं जातं. अशा स्थितीत आपल्या लग्नाच्या पोशाखाचा फोटो सोशल मीडियावर लीक झाला (Wedding Dress leaked in Social Media), तर वधूची काय प्रतिक्रिया असेल, हे आपण समजू शकतो. मात्र सध्या समोर आलेल्या घटनेत यानंतर असं काही घडलं की नवरीचा राग शांत करण्यासाठी नवरदेवाला चक्क आपल्या आईलाच लग्न समारंभातून बाहेर काढावं लागलं. ‘द मिरर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या प्रकरणात ज्या व्यक्तीने लग्नाच्या पोशाखाचा फोटो लीक केला ती दुसरी कोणी नसून नवरदेवाची आई होती. सासूच्या चुकीने सुनेची स्वप्नं धुळीत मिळाली. लग्नाच्या एक दिवस आधी सासूने फेसबुकवर ट्रायलच्या वेळी नवरीच्या ड्रेसचा फोटो पोस्ट केला होता. एवढंच नाही तर तिने सर्व लोकांनाही टॅग केलं. अशात लग्नापूर्वीच तो खास ड्रेस सोशल मीडियावर व्हायरल झाला. लग्न होताच नवरदेवाला ‘जोर का झटका’, भरमंडपात ढसाढसा रडू लागला; VIDEO VIRAL लग्नातील ही घटना खुद्द नवरदेवानेच सांगितली आहे. त्याने सोशल मीडियावर लिहिलं की, ‘लग्नाच्या एक दिवस आधी फॅमिलीचं ड्रेस ट्रायल सुरू होतं. त्यादरम्यान आईने दोन फोटो काढून फेसबुकवर टाकले. माझ्या होणाऱ्या पत्नीने याच ड्रेसमुळे पार्टीची थीमच व्हाईट ठेवली होती. त्यामुळं लग्नाचं सरप्राईज पूर्णपणे खराब झालं.’ लग्नाच्या सुरुवातीला ही बाब कोणालाच कळली नाही, पण समारंभ संपल्यानंतर आईने केलेला हा प्रकार नवरदेवाला कळताच त्याने पत्नीची बाजू घेतली. आईच्या या कृत्यामुळे मुलाने तिला फंक्शनमधून हाकलून दिलं. मुलाचे वडील आणि बहीण देखील आईसोबत तिथून निघून गेले होते मात्र त्याचा भाऊ त्याच्यासोबत थांबला. ‘फोन, लहान मुलं बॅन आणि…’, पाहुण्यांसाठी नवरीच्या विचित्र अटी; वाचून म्हणाल, ‘असं लग्न नको गं बाई’ लोकांनीही या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटिझन्सनी मुलाच्या या निर्णयाचं कौतुक केलं आणि सांगितलं की त्याने अगदी बरोबर केलं. कारण स्पष्टपणे नवरदेवाच्या आईला त्याची पत्नी आवडत नाहीये. अशा परिस्थितीत, त्याने आपल्या पत्नीच्या बाजूने उभा राहाणं आवश्यक आहे. कारण ती तिचं उर्वरित आयुष्य त्याच्यासोबत घालवायला आली आहे. त्याच्यासाठी तिने आपलं कुटुंब सोडलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.