सुमित सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 13 जुलै : लग्न सोहळ्यात (wedding ) नवरी मुलगी (bride) बुलेटवर किंवा एखादा गाण्यावर डान्स करत येत असल्याचं आतापर्यंत आपण पाहिले असेल. पण, पुण्यातील भोसरीमधील एका नवऱ्या मुलीने तर स्कॉर्पिओ गाडीच्या (scorpio car) बोनेटवर बसून लग्न मंडपात एंट्री मारली. तिचे हे धाडस मात्र तिला चांगलेच महागात पडले असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ( bride enters wedding hall sitting on the bonnet of Scorpio car ) पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरात राहणाऱ्या शुभांगी जरांडे (shubhangi jarande) या तरुणीचा विवाहसोहळा सासवड जवळील सिध्देश्वर मंगल कार्यालयात आयोजित केला होता. मात्र लग्नासाठी जात असताना उत्साहाच्या भरात नवरीने दिवे घाटातून चक्क चारचाकी स्कॉर्पिओ गाडीच्या बोनेटवर बसून मंगलकार्यालयाच्या दिशेने प्रवास केला.
धक्कादायक म्हणजे, दिवेघाटात ही तरुणी स्कॉर्पिओच्या बोनेटवर बसलेले होती. घाटातच हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. नवरी मुलगी कारच्या बोनेटवर बसल्याचे पाऊल येणारी जाणारी लोकंही अवाक् झाली. Explainer : प्रियांका विरुद्ध राहुल गांधी खरंच भावंडांमध्ये वाद आहे का? धोकादायक पद्धतीने अशी स्टंटबाजी करताना नवरी मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता, लोणीकाळभोर पोलिसांनी नवरी मुलगी शुभांगी जरांडे, स्कॉर्पिओ ड्रायव्हर गणेश लवांडे आणि व्हिडीओ ग्राफर तुकाराम शेंडगे या तिघांवर लोणीकाळ भोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.