मराठी बातम्या /बातम्या /Viral /आता हद्दच झाली! 'शुभमंगल सावधान'ऐवजी वेगळ्याच घोषणांनी दुमदुमला मंडप; पाहा Wedding Video

आता हद्दच झाली! 'शुभमंगल सावधान'ऐवजी वेगळ्याच घोषणांनी दुमदुमला मंडप; पाहा Wedding Video

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

लग्नाचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील पण असा व्हिडीओ कदाचित नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 08 फेब्रुवारी : सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडीओ खूप व्हायरल होत असतात. यामध्ये नवरदेव-नवरीच्या कपड्यांपासूनलग्नातील गाणी आणि विधींचे व्हिडीओ देखील आवडीने पाहिले जातात. यात काही फनी व्हिडीओ देखील असतात. तर काही व्हिडीओ हे विचित्र असतात. सध्या सोशल मीडियावर नवरदेव-नवरीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. लग्नाच्या विधीदरम्यान हाल घालतानाच्या विधीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

लग्न म्हटलं की त्यामध्ये मंगलाष्टकं, शुभमंगल सावधान असे सूर ऐकायला मिळतात. पण या लग्नात मात्र शुभमंगल सावधानऐवजी वेगळंच काही तरी ऐकायला मिळालं. जसा नवरा-नवरीने एकमेकांना हार घातला तसा वेगळ्याच घोषणांनी लग्नमंडप दुमदुमला. हे पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आगेत.

घूंघट के नीचे...! लग्नानंतर नववधूला पाहताच सासरचे हादरले, नवरदेवाने उचललं टोकाचं पाऊल

व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी हार घालून एकमेकांसमोर उभे आहेत. स्टेजवर वराच्या मागे काही लोक उभे आहेत. जे मोठमोठ्याने ओरडत आहेत. भारत माता की जय अशा घोषणा ते देत आहे. अर्थात लग्नात अशा घोषणा देणारे हे लोक म्हणजे नवरदेवाचेच मित्र आहेत. लग्न म्हटलं की मजामस्ती आली आणि खासकरून नवरदेवाचे मित्र तर नवरा-नवरीला असा त्रास देण्याची एक संधी सोडत नाहीत. पण या मित्रांनी मात्र हद्दच केली आहे.

या घोषणा ऐकताच नवरदेव हसू लागतो. नवरीलाही हसू येतं आहे. सुरुवातीला तिच्या चेहऱ्यावर काही भाव दिसत नाही. पण मनातल्या मनात ती हसते आणि काही वेळातच तिचं हे हसू चेहऱ्यावरही उमटतं. ती हसताना दिसते.

म्हणे, 'सहाही लेकी सासरी गेल्याने...'; अजब कारण देत 65 वर्षांच्या वृद्धाचं 23 वर्षीय तरुणीशी लग्न

@zindagi.ek.safar.h_ इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून लोक प्रतिक्रिया देत आहेत.

तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

First published:

Tags: Funny video, Viral, Viral videos, Wedding