वाढत्या वयात लग्न करणं किंवा पुन्हा लग्न करणं तसं नवं नाही. पण 6 विवाहित लेकींचा बाप असलेल्या वृद्धाने आपल्या लेकीच्याच वयाच्या तरुणीशी लग्न केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.
2/ 6
उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातील पुरे चौधरी गावातील 65 वर्षांच्या वृद्धाने 23 वर्षीय तरुणीसोबत लग्नगाठ बांधली आहे.
3/ 6
नकछेद यादव ज्यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. तिच्यापासून त्यांना 6 मुली आहेत. या सहाही जणींची लग्न झाली आहे. मुलींच्या लग्नानंतर त्यांनीही पुन्हा दुसरं लग्न केलं आहे.
4/ 6
रामनगरी अयोध्येतील कामाख्या देवी मंदिरात नकछेद आणि नंदनी यांचं हिंदू परंपरेनुसार लग्न झालं. लग्नात त्यांचं कुटुंब आणि नातेवाईकही सहभागी झाले होते.
5/ 6
दुसऱ्यांदा लग्न करण्याबाबत कारण देताना नकछेद म्हणाले, सर्व मुली लग्न करून त्यांच्या घरी गेल्या. स्वयंपाक करायला मला जमत नव्हता. त्यामुळे मी दुसरं लग्न केलं.
6/ 6
दरम्यान इतक्या वयस्कर व्यक्तीशी लग्न करूनही आपण खूप आनंदी असल्याचं नंदनी म्हणाली.