• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • मित्राने नवरदेवाला दिलं असं गिफ्ट; VIDEO पाहून नेटिझन्स म्हणाले, 'आता आयुष्यभर कमवण्याची गरज नाही'

मित्राने नवरदेवाला दिलं असं गिफ्ट; VIDEO पाहून नेटिझन्स म्हणाले, 'आता आयुष्यभर कमवण्याची गरज नाही'

नवरदेवाच्या मित्राने तर हद्दच केली.

नवरदेवाच्या मित्राने तर हद्दच केली.

लग्नात मित्राने नवरदेवाला दिलं विचित्र गिफ्ट.

 • Share this:
  मुंबई, ऑगस्ट : लग्नात (Wedding) नवरा-नवरीला (Groom bride) आशीर्वादासह मिळतं ते गिफ्ट (Wedding gift). काही जण लग्नात (Wedding video)  पैशांचा आहेर करतात, काही घरातील उपयोगी वस्तू देतात, काही एखादं छानसं शो-पीस देतात. तर काही जण विशेषतः नवरा-नवरीचे मित्रमैत्रिणी असं काही गिफ्ट देतात ज्याचा कुणी विचारही केला नसेल. लग्नातील अशा विचित्र गिफ्टच बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होत असतात. अशाच व्हिडीओपैकी हा एक व्हिडीओ आहे. नवरदेवाच्या मित्राने लग्नात त्याला असं गिफ्ट दिलं आहे, की पाहून तुम्ही आधी हैराण व्हाल. पण नंतर मात्र तुम्हाला हसू आवरणार नाही. खरंतर गिफ्ट देणार नवरदेवाचा मित्र आणि नवरदेवही स्टेजवर हसू लागतात. व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी स्टेजवर खुर्चीवर बसले आहेत. त्यांच्या मागे नवरदेवाचा मित्र आहेत. त्याचा दोन्ही हातात प्रत्येकी एक नाणं आहे. नाणं हातात धरून तो पोझ देत नवरा-नवरीसोबत फोटो काढतो आहे. हे वाचा - VIDEO - अरे हिला झालंय तरी काय? पाठवणीवेळी नवरीचा अवतार पाहून वऱ्हाडी शॉक आपल्यामागे नेमकं काय चाललं आहे, याची कल्पना नवरा-नवरी दोघांनाही नाही. फोटो काढून झाल्यानंतर तरुण नवऱ्याच्या दिशेने झुकतो आणि आपल्या दोन्ही हातातील शिक्के नवरदेवाच्या हातात ठेवतो.  नवरदेवाला आपलं विचित्र गिफ्ट देताना त्यालाही हसू आवरत नाही. नवराही गिफ्ट पाहू हसू लागतो. सत्यपाल सिंह नावाच्या व्यक्तीने आपल्या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये भावाने तर हनीमूनचं पूर्ण पॅकेज गिफ्ट केलं, असं म्हटलं आहे. हे वाचा - VIDEO : नवरीचं ते कृत्य पाहून स्टेजवरच भडकला नवरदेव; गळ्यातून वरमाळच काढून फेकली व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत. एका युझरने आता या नवरदेवाला आयुष्यभर कमवण्याची गरज नाही असं म्हटलं आहे. तर एकाने या मित्राच्या लग्नात नवरदेवानेही अशीच काही मजा केली असेल, ज्याचा बदला त्याने घेतला असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे.
  Published by:Priya Lad
  First published: