मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO - अरे हिला झालंय तरी काय? पाठवणीवेळी नवरीचा अवतार पाहून वऱ्हाडी शॉक

VIDEO - अरे हिला झालंय तरी काय? पाठवणीवेळी नवरीचा अवतार पाहून वऱ्हाडी शॉक

फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब

फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब

पाठवणी करताना शांत असलेल्या नवरीने आपला वेगळाच अवतार दाखवला.

मुंबई, 16 ऑगस्ट : लग्नातील (Wedding) सर्वात भावनिक क्षण असतो तो म्हणजे नवरीची (Bride) पाठवणी (Bride vidaai). नवरी (Bride video) माहेर सोडून सासरी जात असते. आपल्या माहेरच्या मंडळींचा निरोप घेत असते. त्यावेळी सर्वांच्या अश्रूंचा बांध फुटतो (Bride crying). नवरी आपल्या मायेच्या माणसांना मिठी मारून ढसाढसा रडते (Wedding emotional video). अशा रडणाऱ्या नवरीचे व्हिडीओ (Wedding video) तुम्ही पाहिले असतील. पण सध्या अशा नवरीचा व्हिडीओ (Bride video) व्हायरल होतो आहे, जिने पाठवणीवेळी सर्वांनाच शॉक दिला आहे.

पाठवणी करताना शांत असलेल्या नवरीने आपला वेगळाच अवतार दाखवला. सासरी जाता जाता तिने सासरच्यांसह माहेरच्यांनाही मोठा धक्का दिला आहे. नेमकं तिने काय केलं ते पाहा.

View this post on Instagram

A post shared by Om Bishnoi (@ombishnoi229)

व्हिडीओत पाहू शकता नवरीची पाठवणी होती आहे, पाठवणीवेळची विधी केली जात आहे. ज्यामध्ये नवरी सुपातील धान्य आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीत धरून मागच्या दिशेने फेकते. सुरुवातीला ही नवरी हळूच आपल्या ओंजळीत सुपातील धान्य घेते आणि मागे फेकते, त्यानंतर मात्र तिचा हात भरभर चालतो, ती भराभरा सुपातील धान्य उचलून मागे फेकताना दिसते. जणू काही तिला रागच आला आहे आणि एकदाचा तिने हा विधी उरकून घेतला आहे, असंच दिसतं आहे.

हे वाचा - नवरी समोर येताच गेला नवरदेवाचा तोल; मित्रानं सावरत दिला हा सल्ला, पाहा VIDEO

नवरीचा हा अवतार पाहून तिथं उपस्थित लोकही शॉक होतात. नवरीला नेमकं झालं तरी काय? असा प्रश्न प्रत्येकाला डला आहे. ओम बिश्नोई इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

First published:
top videos

    Tags: Bride, Viral, Viral videos, Wedding, Wedding video