नवी दिल्ली 17 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) नवरदेव आणि नवरीचे अनेक असे व्हिडिओ (Bride and Groom Video) पाहायला मिळतात, ज्यात दोघंही लग्नासाठी अतिशय उत्सुक असतात. मात्र, अनेकदा असंही चित्र पाहायला मिळतं की नवरी आणि नवरदेवाचं स्टेजवरच भांडण सुरू झालं. सध्या असाच काहीसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) झाल्याचं पाहायला मिळत आहे. यात दिसतं, की वरमाळेच्या वेळी नवरदेवाला राग अनावर होतो. हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. विवाहित असूनही दुसरीसोबत थाटला संसार; एका FB पोस्टमुळे फुटलं बिंग अन्… इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Viral Video) दिसतं, की वरमाळेच्या कार्यक्रमादरम्यान नवरी नवरदेवाला वरमाळा घालण्यासाठी पुढे येते. इतक्यात वरमाळा तुटते. यानंतर नवरी तुटलेली वरमाळाच नवरदेवाच्या गळ्यात टाकते. हे पाहून नवरदेवाला राग येतो आणि तो रागातच तुटलेली ही वरमाळा हातात घेऊन लोकांकडे फेकतो.
पार्कमध्ये खेळताना दिसले तालिबानी; गाड्यांवर, घोड्यावर बसून मस्ती करतानाचे VIDEO नवरदेवाचा राग पाहून अनेकांनं त्याची मस्करी केली आहे. लोकांनी हा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करत लिहिलं, की बहुतेक याच्याकडे सरकारी नोकरी नव्हती. फेसबुकवर हा व्हिडिओ (Facebook Video) नितश यादवनं शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ साडे तीन लाखाहून अधिकांनी लाईक केला आहे. इतकंच नाही तर तब्बल 1 कोटी 30 लाखहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर कमेंट केल्या आहेत.

)







