पाटणा 30 मार्च : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. मात्र जर एखादा नवरदेव लग्नानंतर काहीच तासात फरार झाला तर? अशीच एक घटना बिहारच्या मुझफ्फरपूरमधून समोर आली आहे. इथल्या सकरा क्षेत्रात एका प्रियकरानेच आपल्या प्रेयसीची फसवणूक केली. मिळालेल्या माहितीनुसार, आईच्या उपचारासाठी आलेल्या तरुणीला सहा महिन्यांपासून प्रेमाच्या जाळ्यात अडकवून हा युवक लपून भेटत असे.
लग्नानंतर चारच दिवसांत तरुणाचा पुन्हा मेहुणीसोबत विवाह; प्रेम नाही, 'हे' आहे यामागचं अजब कारण
एक दिवस हा युवक प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. इथेच तरुणीच्या घरच्यांनी दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. यानंतर घरातील लोक आणि गावकऱ्यांनी त्यांना पकडून त्यांचं लग्न लावून दिलं. मुझफ्फरपूरच्या सकरा भागातील मुलगी तिच्या आईच्या उपचारासाठी समस्तीपूर येथील रुग्णालयात पोहोचली होती. तेथे तिची समस्तीपूरमधील बाघौनी येथील रहिवासी गोलू कुमारशी भेट झाली. गोलू हा हॉस्पिटलमध्ये कंपाउंडर म्हणून काम करायचा. दोघेही प्रेमात पडले आणि गुपचूप भेटू लागले.
गोलू सोमवारी प्रेयसीला भेटण्यासाठी गेला असता, कुटुंबीयांनी दोघांना पाहिलं. यानंतर गावापासून पोलीस ठाण्यापर्यंत हायव्होल्टेज ड्रामा सुरूच होता. पोलीस ठाण्यात मुलीकडील लोक लग्नावर ठाम होते. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही पक्षांची समजूत घातली. यानंतर तरुणाने रात्री उशिरा मुलीच्या घरी पोहोचून हिंदू रितीरिवाजांनुसार तिच्याशी लग्न केलं.
लग्नानंतर काही वेळातच मुलीच्या बाजूचे लोक निरोपाची तयारी करत असताना तरुणाने संधी साधून पळ काढला. मुलीच्या कुटुंबीयांना हा प्रकार कळताच एकच गोंधळ उडाला. घाईघाईत लोकांनी त्या मुलाचा शोध सुरू केला, पण तो सापडला नाही. या प्रकरणी रामपूर कृष्णा पंचायतीचे प्रमुख मनोज कुमार यांनी सांगितलं की, पंचायत झाल्यानंतर मुलगा मुलीशी लग्न करण्यास तयार झाला. यानंतर दोघांनी रात्री उशिरा हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केलं,.मात्र काही तासांनंतर मुलगा अचानक फरार झाला, त्याचा शोध सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marriage, Viral news