मराठी बातम्या /बातम्या /Viral /

नवरदेवाचं 'ते' कृत्य पाहून भडकली नवरी; खुर्चीतच मांडला ठाण, वरमाला घालायलाही तयार नाही

नवरदेवाचं 'ते' कृत्य पाहून भडकली नवरी; खुर्चीतच मांडला ठाण, वरमाला घालायलाही तयार नाही

तोपर्यंत आपण वरमाला घालणारच नाही, असंच नवरीने ठरवलं.

तोपर्यंत आपण वरमाला घालणारच नाही, असंच नवरीने ठरवलं.

तोपर्यंत आपण वरमाला घालणारच नाही, असंच नवरीने ठरवलं.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 30 ऑगस्ट : लग्नामध्ये (Wedding Video) मजेमजेत असं खूप काही केलं जातं, जे काही जणांना आवडत नाही. सध्या अशाच एका लग्नाचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. ज्यात लग्नामध्ये नवरदेवाने असं काही केलं की नवरीला (Bride Groom Video) राग आला. मग नवरीने वरमाला घालायलाही नकार दिला.

लग्नातील विधीपैकी एक असते ते म्हणजे नवरा-नवरीने एकमेकांना वरमाला घालणं. यावेळी बहुतेक वेळा नवरा-नवरीला त्यांचे नातेवाईक उचलून धरतात. हल्ली तर नवरा-नवरी स्वतःचा जमिनीवर गुडघे टेकून बसतात आणि एकमेकांना वरमाला घालतानाही दिसतात. पण वरमालावेळी अशी केली जाणारी मजा एका नवरीच्या मात्र पचनी पडली नाही.

व्हिडीओत पाहू शकता, नवरदेवाला त्याच्या मित्रांनी उचलून धरलं आहे. मग का नवरदेव आणि त्याचे मित्र शेर आहेत तर नवरी सव्वाशेर आहे. आपणही काही कमी नाही हे तिने दाखवून दिलं. जसं वरमालावेळी नवरदेवाच्या मित्रांनी त्याला उचललं. जेणेकरून नवरी त्याला सहजासहजी वरमाला घालू शकणार नाही. मग त्यांना काय माहिती त्यांचा हा स्मार्टनेसपणा त्यांनाच भारी पडेल.

हे वाचा - ...अन् नवरदेवावर भडकली मेहुणी, भरमंडपातच केला तमाशा; VIDEO VIRAL

नवरीला उचलणारं तिथं कुणी नव्हतं आणि तिला इतक्या उंचावर वरमाला घालता येत नव्हती मग काय ती आपली गप्पपणे वरमाला हातात घेऊन खुर्चीत बसली. खाली ये आणि वरमाला घाल असंच ती नवरदेवाला सांगत होती. तोपर्यंत तीसुद्धा वरमाला घालायला काही तयार नाही. नवरदेवाचे मित्र तिला समजावत होते पण ती ऐकायलायच तयार नाही. अखेर नवरदेवाला जमिनीवर यावंच लागलं. जेव्हा नवरदेवाला त्याच्या मित्रांनी खाली उतरवलं तेव्हा नवरी खुर्चीवरून उठली आणि मग दोघांनीही एकमेकांना वरमाला घातल्या. यावेळी नवऱ्याचा चेहरा पाहण्यासारखा होता.

हे वाचा - VIDEO: अचानक नवरदेवाजवळ बसलेली नवरी उठून पळू लागली; केलं असं काही की सगळे थक्क

करिश्मा नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नेटिझन्सच्या चांगल्याच पसंतीस पडत आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

First published:

Tags: Bridegroom, Viral, Viral videos, Wedding video