मराठी बातम्या /बातम्या /Viral /Oh no! पाठवणीवेळी नवरीबाईने वाजवला नवरदेवाचा बँड; गाडीत बसताच केली धुलाई, VIDEO VIRAL

Oh no! पाठवणीवेळी नवरीबाईने वाजवला नवरदेवाचा बँड; गाडीत बसताच केली धुलाई, VIDEO VIRAL

नवरी अचानक आऊट ऑफ कंट्रोल झाली आणि नवरदेवाला मारू लागली.

नवरी अचानक आऊट ऑफ कंट्रोल झाली आणि नवरदेवाला मारू लागली.

नवरी अचानक आऊट ऑफ कंट्रोल झाली आणि नवरदेवाला मारू लागली.

मुंबई, 10 सप्टेंबर :  लग्नातील (Wedding video) सर्वात भावुक क्षण असतो तो पाठवणीचा क्षण (Bidaai video). माहेरची मंडळी आपल्या लाडक्या लेकीला निरोप देत असतात. नवरी (Bride video) आपल्या माहेरच्या मंडळींचा निरोप घेत असते आणि सासरी जात येते. तेव्हा ती खूप रडत असते. पण सध्या अशा नवरीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात पाठवणीवेळी ही नवरी रडणं दूर उटल तिने नवरदेवाची (Groom video) धुलाई केली आहे (Bride beaten groom in car).

लग्नानंतर बायकोचं ऐकावं लागणार, तिच्या तालावर नाचावं लागणार असं मजेत म्हटलं जातं. किंबहुना काही पुरुष तर लग्न करताना तशी मनाची तयारीही करून ठेवतात. पण शादी के साइड इफेक्ट लग्नानंतर काही महिन्यांनी दिसू लागतात. पण इथं तर चक्क लग्नाच्या दिवशीच नवरदेवाला भोगावं लागलं आहे.

व्हिडीओत पाहू शकता, नवरा-नवरी कारमध्ये बसले आहेत. नवरी अचानक नवरदेवाला मारू लागते.

हे वाचा - लग्नाच्या दिवशी नवरा-नवरीचा भलताच 'खेळ' रंगला; Video पाहून डोक्याला लावाल हात

एका हातात मानेतून त्याची कॉलर पकडते आणि दुसऱ्या हाताने त्याच्या गालावर चापटी मारते.  सासरच्या घरी तिने पाऊलही ठेवलं नाही. माहेरचं घर नुकतंच सोडलं आणि सासरी पोहोचलीसुद्धा नाही. तोवर या नवरीने आपलं खरं रूप दाखवलं. तिने रुद्रावतार धार केला.  जणू काही तिच्यात भूतच संचारला आहे.

हे वाचा - चालू लग्नमंडपातून नवरदेव पळाले; थेट दरीत जाऊन केले लग्न

_.chutiyapa. इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून प्रत्येकाला धक्का बसला आहे. नवरी नवऱ्याला असं का मारते आहे, तेच समजत नाही आहे. नेटिझन्सना हाच प्रश्न पडला आहे. नवरदेवाची सर्वांना दया येते आहेत. नवरदेवाबाबत वाईट वाटतं आहे, बिचाऱ्याचं पुढचं आय़ुष्य खराब होणार आहे, अशा कमेंट काही युझरने केल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Bridegroom, Viral, Viral videos, Wedding video