मराठी बातम्या /बातम्या /Viral /लग्नाच्या दिवशी नवरा-नवरीचा भलताच 'खेळ' रंगला; Video पाहून डोक्याला लावाल हात

लग्नाच्या दिवशी नवरा-नवरीचा भलताच 'खेळ' रंगला; Video पाहून डोक्याला लावाल हात

आपल्या लग्नाच्या दिवशी असं कुणी काही करतं का?

आपल्या लग्नाच्या दिवशी असं कुणी काही करतं का?

आपल्या लग्नाच्या दिवशी असं कुणी काही करतं का?

मुंबई, 10 सप्टेंबर : लग्नात (Wedding video) नवरा-नवरीमध्ये (Bride groom video) बरेच रोमँटिक क्षण पाहायला मिळतात. पण सध्या नवरा-नवरीचा असा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात रोमँटिक होणं सोडा नवरा-नवरी एकमेकांकडे पाहतही नाही आहेत. लग्नाच्या दिवशी दोघांचाही भलताच खेळ रंगला आहे (Bride groom playing on wedding).

सोशल मीडियावर या नवरा-नवरीची चांगलीच चर्चा होते आहे. या दोघांनी असं काही केलं आहे की तुम्ही पाहाल तर डोक्याला हातच लावाल. यांचं हे काय चाललं आहे, असंच म्हणाल.

व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी मस्त खेळताना दिसत आहेत. दोघंही आपापल्या मोबाईलवर व्हिडीओ गेम खेळण्यात व्यस्त आहेत.

हे वाचा - चालू लग्नमंडपातून नवरदेव पळाले; थेट दरीत जाऊन केले लग्न

लग्नात विधी-परंपराप्रमाणे काही मजेशीर खेळही असतात. जे नवरा-बायको एकमेकांसोबत खेळतात. म्हणजे लग्नाच्या परंपरेचा तो एक भाग असतो. पण इथं मात्र हे नवरा-नवरी असे लग्नाचे खेळ खेळताना दिसत नाही आहे. तर एकमेकांच्या शेजारी बसून मोबाईल गेम खेळत आहेत.

लग्नाच्या कपड्यातच दोघंही मांडी घालून एका बेडवर बसले आहेत आणि त्यांच्या मागे एक खिडकीही दिसत आहे. ज्यात थोडा अंधार दिसतो आहे. यावरून कदाचित हे दृश्य लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या घरातील असावं असंच वाटतं आहे.

हे वाचा -  VIDEO - तरुणांनी स्वतःला आगीत झोकून दिलं; Burning car मधून वृ्द्धांना वाचवलं

निरंजन महापात्रा इन्स्टाग्राम युझरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.  हा व्हि़डीओ पोस्ट करताना ते पब्जी खेळत असल्याचं सांगण्यात आलं आहे. पण एका युझरने ते फ्री फायर खेळत असल्याचं म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Viral, Viral videos, Wedding, Wedding video