जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अरे यांना आवरा! लग्नातच भिडले वधू आणि वरपक्ष, बुटासाठी घातला राडा; VIDEO VIRAL

अरे यांना आवरा! लग्नातच भिडले वधू आणि वरपक्ष, बुटासाठी घातला राडा; VIDEO VIRAL

अरे यांना आवरा! लग्नातच भिडले वधू आणि वरपक्ष, बुटासाठी घातला राडा; VIDEO VIRAL

लग्नात अशी बूटचोरी तुम्ही कधीच पाहिली नसेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 ऑक्टोबर : लग्नात मजामस्तीसह रुसवेफुगवे, छोटो-मोठे वादही पाहायला मिळतात. सध्या अशा एका लग्नाचा व्हिडीओ (Wedding video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video)  होतो आहे, ज्यात वधू-वर दोन्ही पक्षाने अक्षरशः राडा घातला आहे आणि हा राडा कशासाठी तर चक्क फक्त बुटांसाठी (Juta churai video). नवरदेवाच्या बुटांसाठी नवरा आणि नवरीचं कुटुंब लग्नातच आपसात भिडलं. लग्नाचा असा व्हिडीओ तुम्ही कधीच पाहिला नसेल. लग्नात मेहुणी नवरदेवाचे (Jija Saali Video) बूट चोरते हे आपल्याला माहितीच आहे. पण त्याचवेळी नवरदेवाचे भाऊ, त्याचे मित्र त्याचे हे बूट चोरीला जाणार नाहीत, यावर लक्ष ठेवून असतात. मेहुण्या जस बुटांवर टपलेल्या असतात तसं नवरदेवाकडील ही मंडळी बूट चोरी होऊ नये म्हणून सावध असतात. असाच हा बूटचोरीचा व्हिडीओ आहे. पण यामध्ये नवरदेवाच्या नकळत बूट चोरण्यात आलेले नाहीत. तर नवरदेवाच्या पायातून बूट हिसकावून घेण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्या बुटांसाठी दोन्ही पक्ष आपसात भिडले.

जाहिरात

दोन मिनिटांपेक्षाही जास्त वेळचा हा व्हिडीओ आहे. सुरुवातीला नवरदेव एखाद्या राजासारखी एंट्री मारताना दिसतो. त्यानंतर नवरदेवाला सर्वजण घेरतात. मेहुण्या आपल्या दाजींच्या पायातील बूट काढण्याचा प्रयत्न करतात. तर नवरदेवाचे मित्र-भाऊ त्या मेहुण्यांपासून बूट हिसकावण्याचा. त्यांच्या या भांडणात बिचाऱ्या नवरदेवाची अवस्था मात्र बेकार झाली आहे. हे वाचा -  VIDEO - लगीन सोडून नवरदेवाला घरी जाण्याची घाई, पंडितचा प्रश्न ऐकूनच फुटला घाम बूट हातात येताच काही मंडळी एकमेकांकडे हे बूट फेकताना दिसतात. अखेर या लढाईत विजय हा वधू पक्षाचाच झालेला दिसतो. व्हिडीओच्या शेवटी मेहुणी आपल्या हातात नवरदेवाचे बूट धरून दिसते. विटी वेडिंग इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात