कीव, 18 जानेवारी : एखादा बॉम्ब फुटल्यानंतर किती विध्वंस होतो हे तुम्हाला माहितीच आहे. असाच खतरनाक बॉम्ब एका सैनिकाच्या छातीत अडकला होता. हा बॉम्ब सैनिकाच्या छातीत जिवंत होता. तो कधीही फुटण्याची शक्यता होती. सैनिकाच्या शरीरातून हा बॉम्ब बाहेर काढणं म्हणजे डॉक्टरांसाठी आव्हानात्मक होतं. सैनिकासह आपलाही जीव धोक्यात टाकण्यासारखं होतं. पण तरी सर्जरी करून डॉक्टर तो बॉम्ब शरीराबाहेर काढायला गेला आणि त्यानंतर काय घडलं ते पाहुयात.
युक्रेनमधील ही घटना आहे. युक्रेन आणि रशियात युद्धादरम्यान घडलेली ही घटना. एका युक्रेनी सैनिकाच्या छातीवर ग्रेनेड बॉम्ब डागण्यात आला. हा बॉम्ब हातांनी फेकल्या जाणाऱ्या बॉम्बपेक्षा वेगळा असतो. यासाठी लाँचरचा वापर केला जातो.हा बॉम्ब थेट सैनिकाच्या छातीवर लागून तो त्याच्या शरीरात गेला. सामान्यपणे जेव्हा हा बॉम्ब टार्गेटवर आपटतो तेव्हा दाबाने तो फुटतो. पण आश्चर्य म्हणजे सैनिकाच्या छातीतील हाड्यांना सापळ्यांना आपटल्यानंतरही हा बॉम्ब फुटला नाही, तो तसाच जिवंत तिथं अडकून राहिला.
हे वाचा - ना अनुभव, ना ट्रेनिंग; 2 महिन्यांपूर्वी बातमी पाहून IAS अधिकाऱ्याने वाचवला नागरिकाचा जीव
युक्रेनचे उपरक्षामंत्री हन्ना मालियार यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर याचा फोटोही शेअर केला आहे. ज्यात सैनिकाच्या छातीचा एक्स-रे फोटो आहे. ज्यात त्याच्या छातीत अडकलेला ग्रेनेड स्पष्टपणे दिसतो आहे.
फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा ग्रेनेड काढण्यासाठी ऑपरेशन करण्यात आलं. सैनिकाच्या शरीरात हा ग्रेनेड फुटला नाही. पण ग्रेनेडचा कधीही स्फोट होण्याची शक्यता होती. त्यामुळे इलेक्ट्रोकोएग्यूलेशनशिवाय म्हणजेच सर्जरीवेळी रक्तस्राव नियंत्रित कऱण्याच्या पद्धतीशिवायच हे ऑपरेशन करण्यात आलं. कारण या प्रक्रियेत सरीरात कमी प्रमाणात करंट सोडून रक्तवाहिन्यांचे किनारे हलकेसे जाळले जातात. जेणेकरून जखम भरेल. पण या सर्जरीत या प्रक्रियेमुळे इलेक्ट्रिक करंटमुळे ग्रेनेडचा विस्फोट होण्याची शक्यता होती.
हे वाचा - काळ आला होता, वेळ नाही! 19 सेकंद 'मृत' होऊन महिला पुन्हा जिवंत झाली; चक्क घड्याळाने वाचवला जीव
ऑपरेशन इतकं खतरनाक होतं की जखमी सैनिकासह त्याच्यावर उपचार करणाऱ्या सर्वांचा जीव धोक्यात होता. छोटीश्या चुकीमुळेही ग्रेनेडचा स्फोट होऊन सर्वांचा जीव जाण्याची भीती होती.
पण सुदैवाने डॉक्टरांनी ही रिस्क घेतली आणि सर्जरी यशस्वीरित्या पार पडली आहे. त्यामुळे ही सर्जरी कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Lifestyle, Viral, World news