चंदीगड, 18 जानेवारी : जीवन-मृत्यू कुणाच्या हातात नाही. एखाद्याचा जीव वाचवायचा म्हटला की आपण डॉक्टरांकडे धाव घेतो. म्हणून तर डॉक्टरांना देवही मानलं जातं. पण एका आयएएस ऑफिसरने कोणताही अनुभव, कोणतंही ट्रेनिंग न घेता एका व्यक्तीचा जीव वाचवला आहे. अक्षरशः त्यांनी त्या व्यक्तीला मृत्यूच्या दारातूनच खेचून आणलं आहे. त्याच्यासमोर उभ्या असलेल्या मृत्यूला त्याने काही मिनिटांत पळवून लावलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
चंदीगढ सेक्टर 41 मधील रहिवासी जनक लाल मंगळवारी सकाळी चंदीगड हाउसिंग बोर्ड (सीएचबी) च्या कार्यालयात गेले. तिथं त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते खाली कोसळले. चंदीगढमधील आरोग्य सचिव यशपाल गर्ग यांना याची माहिती मिळाली. तसे ते तात्काळ तिथं पोहोचले. त्यांनी जनक यांना सीपीआर दिला आणि त्यांचा जीव वाचवला. आता त्यांना सेक्टर-16 मधील सरकारी मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हे वाचा - VIDEO - रस्त्यात समोर होता मृत्यू! यमराजाआधी देवदूत बनून आला पोलीस; वाचवला शेतकऱ्याचा जीव
प्रसारमाध्यमांशी बोलताना यशपाल म्हणाले, "मी सीएचबीमध्ये माझ्या केबिनमध्ये होतो. यावेळी जनसंपर्क विभागाचे राजीव तिवारी माझ्या केबिनमध्ये धावत आले आणि त्यांनी सीएचबी सेक्रेटरी चेंबरमध्ये एक व्यक्ती पडल्याचं सांगितलं. मी तिथं गेलो आणि त्या व्यक्तीला सीपीआर दिला"
यशपाल यांना सीपीआर देण्याचा अनुभव नव्हता किंवा त्यांनी ट्रेनिंगही घेतलं नव्हतं. फक्त दोन महिन्यांपूर्वी त्यांनी न्यूज चॅनेलवर एका डॉक्टरला रुग्णाला सीपीआर देऊन वाचवताना पाहिलं होतं.
हे वाचा - मित्रांसोबत बोलत असताना हात मागे घेतले अन् तसाच कोसळला; बॉडी बिल्डरचा भयावह शेवट
"मला माहिती होतं ती प्रक्रिया मी करतो आहे, ते ठिक ठरणार नाही. पण त्यावेळी मला जे सुचलं ते मी केलं. आयुष्य वाचवण्याचे तात्काळ प्रयत्न इतर गोष्टींवर वेळ घालवण्यापेक्षा महत्त्वाचं होतं", असं ते म्हणाले.
एक आदमी को हार्ट अटैक आया तो चंडीगढ़ के हेल्थ सेक्रेटरी IAS @Garg_Yashpal जी ने तुरंत CPR देकर उस आदमी की जान बचाई। उनके इस काम की जितनी सराहना की जाए उतनी कम है। हार्ट अटैक से जानें बचाई जा सकती हैं। हर इंसान को CPR सीखना चाहिए। pic.twitter.com/C7dWVsAoOI
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) January 18, 2023
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी ट्विटर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी यशपाल यांचं कौतुक केलं आहे आणि प्रत्येकाने सीपीआर शिकायला हवा असं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Heart Attack, Lifestyle, Viral, Viral videos