लंडन, 17 जानेवारी : घड्याळाचा काम काय तर वेळ दाखवणं. पण तुम्ही घड्याळाने कुणाचा जीव वाचवल्याचं ऐकलं आहे का? निर्जीव घड्याळ कुणाचा जीव कसा काय वाचवेल? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. पण एका महिलेने घड्याळाने आपला जीव वाचवल्याचा दावा केला आहे. ही महिला मृत्यूच्या दारात पोहोचली होती. पण म्हणतात का काळ आला होता वेळ नाही… तसं या महिलेवर आलेली वाईट वेळ तिच्या घड्याळानेच उलटवून लावली. यूकेत राहणारी 59 वर्षांची इले थॉम्पसन जिने आपल्या हातातील घड्याळाने आपला जीव वाचवला असा दावा केला आहे. अॅपल वॉचने तिला वाचवलं आहे. अॅपल इनसाइडरच्या माहितीनुसार इलेला 2018 साली सिझर आला होता. त्यावर उपचार झाले आणि त्यानंतरचे रिपोर्टही नॉर्मल आले. पण तरी तिला काही ना काही त्रास होत होता. तेव्हा 2022 साली तिच्या मुलीने तिला अॅपल वॉच वापरण्याचा सल्ला दिला. यानंतर एक दिवस या घड्याळाने अलर्ट दिला. तशी इलेने तात्काळ डॉक्टरांकडे धाव धेतली. हे वाचा - आजीबाईने WWE रेसलरची लावली वाट! 26 सेकंदात 50 मुक्के मारले आणि शेवटी…; पाहा VIDEO डॉक्टरांनी तिची तपासणी केली पण तिचे रिपोर्ट नॉर्मल होते. तेव्हा त्यांनी तिला हार्ट हार्ट मॉनिटर दिलं, ज्यावर एक आठवडा तिला हार्टवर लक्ष ठेवालला सांगितलं. जानेवरी 2023 झाली या हार्ट मॉनिटरने अलर्ट दिला. तिच्या मेंदूत काही हालचाल होत नव्हती. हार्टबिटही 19 सेकंदासाठी थांबलं होतं. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टरांनी तिला ती झोपेत 19 सेकंद मृतावस्थेतच गेल्याचं सांगितलं. तिच्या हृदयाची धडकण्याची गती कमी झाली होती. तिच्या हार्टमध्ये ब्लॉकेज होते आणि तिला लगेच पेसमेकरची गरज असल्याचं सांगितलं. डॉक्टरांच्या मते, ही एक गंभीर स्थिती आहे आणि यामुळे रुग्णाचा जीवही जाऊ शकतो.
इलनने पुढच्या दिवशीच पेसमेकर लावला आता ती बरी आहे. आपला जीव वाचवण्याचं श्रेय ती आपल्या अॅपल वॉचला देते. घड्याळाने अलर्ट केला म्हणून ती डॉक्टरांकडे गेली. आता ती नेहमी हे घड्याळ घालते, असंही ती म्हणाली.
अॅपलने जीव वाचवल्याची ही पहिली घटना नाही. याआधीही अशी बरीच प्रकरणं समोर आली आहेत. तुम्हालाही असा काही किस्सा माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.