Home /News /viral /

...अन् वहिनीने काठीने चोप चोप चोपलं; भीतीने आईच्या मागे दडून बसला दीर; पाहा VIDEO

...अन् वहिनीने काठीने चोप चोप चोपलं; भीतीने आईच्या मागे दडून बसला दीर; पाहा VIDEO

शेवटी दिराला वहिनीच्या तावडीतून सोडवण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांना मध्यस्थी करावी लागली.

  Mमुंबई, 12 ऑगस्ट : सासरी गेल्यानंतर मुलीला सर्वात मोठी हिंमत देणारा असतो तो म्हणजे दिर (Devar Bhabhi). सासरी तो तिचा पहिला मित्र असं म्हणायला हरकत नाही. दीर आणि वहिनी (Devar Bhabhi Video) यांचं नातं काही वेगळंच असतं. कधी ते मित्र-मैत्रिणी असतात, कधी बहीण-भाऊ होतात तर कधी आई आणि लेक. पण त्यांच्यातील केमिस्ट्री मजेशीर असते. अशीच मजेशीर केमिस्ट्री असलेल्या वहिनी आणि दिराचा (Dir vahini) व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात वहिनीने दिराची चांगलीच धुलाई केली आहे. नववधू लग्न करून सासरी आली. सासरी येताच वहिनी आणि दिरात फायटिंग झाली. मग काय नुकत्याच आलेल्या वहिनीने संधी सोडली नाही, तिने दिराला चांगलंच चोपलं आहे.
  व्हिडीओत पाहू शकता दिर आणि वहिनी दोघांच्याही हातात झाडाची फांदी आहे. या फांदीने ते एकमेकांना मारताना दिसत आहे. हे वाचा - नवरदेव ठोंब्यासारखा बसून राहिला, अखेर पंडितनेच...; लग्नाचा VIDEO पाहून व्हाल शॉक दिर वहिनीला मारतो तशी वहिनीसुद्धा दिराला मारते. नंतर मात्र वहिनी दिराला काठीने सपासप मारतच जाते. वहिनीचं असं रूप पाहून दिरही घाबरतो. पण वहिनी काही थांबायचं नाव घेत नाही. अखेर तिला थांबवण्यासाठी आणि दिराला तिच्या तावडीतून सोडवण्यासाठी कुटुंबातील सदस्याला मध्यस्थी करावी लागते. दिर तर घाबरून  तो या लढाईतून माघार घेतो. मैदान सोडतो आणि आपल्या वहिनीपासून वाचण्यासाठी आईच्या मागे जाऊन लपतो. आता व्हिडीओ पाहून तुम्हाला समजलं असेल ही लढाई खरोखरची नाही. कारण आजूबाजूला सर्वजण हसताना दिसत आहेत. ही एक लग्नानंतरची प्रथा आहे. जिथं दिर आणि वहिनी एकमेकांना काठीने असं मारतात. पण मजेमजेत हा मार जरा जास्तही बसतो. हे वाचा - नवरीचे दागिने गायब, मेकअपही बिघडला; लग्नादिवशीच नवऱ्याने मग...; पाहा VIDEO हनी प्रजापति इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नेटिझन्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. त्यावर मजेशीर कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Funny video, Viral, Viral videos, Wedding video

  पुढील बातम्या