मुंबई : भारतात लोकसंख्या जास्त वाढली आहे. म्हणून मधल्या काळात बरेच कॅम्पेन केले गेले, ज्यामध्ये ‘हम दो हमारे दो’ असा देखील सरकाने कॅम्पेन चालवलं. आत्ता तर बहुतांश लोक एका मुलावरच समाधान मानतात कारण मुलांचा शिक्षणाचा खर्च आणि इतर सोयी पुरवणं आई-वडिलांना शक्य होत नाही. पण विचार करा की जर सरकारने तुम्हाला सांगितलं की तुम्ही फक्त मुलांना जन्म द्या बाकी त्यांचा सर्व खर्च आम्ही करु तर… असं भारतात होणे शक्य नाही, पण एक असा देश आहे. जेथील सरकार जोडप्यांना आई-वडिला होण्यासाठी आणि मुलांना जन्म देण्यासाठी आग्रह करत आहे, शिवाय मुलांच्या जन्माचा खर्च, त्यांचं शिक्षण आणि त्यांना इतर सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. आधी UPI द्वारे पैसे पाठवणार, मग खाली करणार तुमची बँक; QR कोडचा हा Scam माहितीय का? आता तुम्हाला नक्कीच असा प्रश्न पडला असेल की हा नक्की कोणता देश आहे? तर हा जपान देश आहे. जपान देशाच्या सरकारने असा का निर्णय घेतला? चला पाहू. जपानवर झपाट्याने घटणाऱ्या लोकसंख्येचे गंभीर संकट उभे ठाकले आहे. देशातील जन्मदर कमी झाल्यामुळे जपान सरकार दीर्घकाळापासून या समस्येला तोंड देण्यासाठी उपाययोजना करत आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी अलीकडेच लोकसंख्येच्या संकटाच्या धोक्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. खासदारांना संबोधित करताना किशिदा म्हणाले की, घटत्या लोकसंख्येच्या संकटावर मात करण्यासाठी कोणीही अधिक प्रतीक्षा करू शकत नाही. ते म्हणाले की, आपला देश ‘आता किंवा कधीच नाही’ अशा परिस्थितीचा सामना करत आहे. या दिशेने, जपानने देशातील घटता जन्मदर पूर्ववत करण्यासाठी अनेक उपाय सुचवले आहेत. प्रस्तावांमध्ये मुलांचे संगोपन आणि शिक्षणासाठी उच्च अनुदाने आणि तरुण कामगारांना विवाह करण्यास आणि मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी वेतन वाढ यांचा समावेश आहे.
जपानची सध्याची लोकसंख्या 125 दशलक्ष आहे. तसेच जपानमध्ये होत असलेली जन्मदरात घट पाहिल्यानंतर 2060 पर्यंत लोकसंख्या सुमारे 90 दशलक्षांपर्यंत खाली येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कमी होत असलेल्या लोकसंख्येचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि राष्ट्रीय सुरक्षेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवाय, या प्रदेशात चीनच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रादेशिक महत्त्वाकांक्षा पाहता जपान सरकार या समस्येबद्दल अधिक चिंतित आहे. जपान अशा उपायांवरही विचार करत आहे, ज्यामुळे सांस्कृतिक, मानसिकता अधिक लैंगिक समानतेला बदलू शकतील.