Home /News /viral /

कमालच झाली! चक्क माशाने केली Driving; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO

कमालच झाली! चक्क माशाने केली Driving; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO

पोहोण्यात तरबेज असलेल्या माशाचं ड्रायव्हिंग स्किल पाहून थक्क व्हाल.

    मुंबई, 06 जानेवारी : मासा म्हणजे जलचर (Fish video). जो फक्त पाण्यात पोहोतो हे आपल्याला माहिती आहे. त्याला हातपाय नसतात तर फक्त पर असतात. आता ड्रायव्हिंग किंवा गाडी चालवणं म्हटलं तर त्यासाठी हात आणि पायांची गरज पडते. माशाला तर हातपाय नसतात, फक्त परच असतात. अशात मासा ड्रायव्हिंग करणं शक्यच नाही (Fish driving video), असंच तुम्ही म्हणाल. पण आपल्याला अशक्य वाटणारी ही गोष्ट माशाने मात्र प्रत्यक्षात करून दाखवली आहे. एका गोल्डफिशने चक्क ड्रायव्हिंग केली आहे (Goldfish Drives Car). पाण्यात आपला मार्ग शोधणाऱ्या या माशाने (Fish Navigation System) रस्त्यावरही कार चालवून दाखवली आहे. पहिल्यांदाच एका माशाने ऑपरेटेड व्हिकल चालवलं आहे (fish operated vehicle). इस्राइलच्या बेन गुरियॉन युनिव्हर्सिटीच्या (Ben-Gurion University in Beersheba, Israel) शास्त्रज्ञांनी हा प्रयोग केला. बिहेवेरिअल ब्रेन रिसर्च जर्नलमध्ये (Behavioural Brain Research Journal) हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. हे वाचा - OMG! हे कसं शक्य आहे? जिवंत बेडकाच्या पोटात पेटते लाइट; VIDEO VIRAL शास्त्रज्ञांनी एक रोबोटिक कार (Robotic Car)  बनवली होती. या कारच्या वर काचेचा एक टँक होता, ज्यात पाणी होतं. त्यामध्ये एक गोल्ड फिश ठेवण्यात आला. माशाच्या तोंडाची दिशा समजण्यासाठी एक लाईडारही इम्प्लांट करण्यात आला होता, जो कॉम्प्युटरला जोडण्यात आला होता. लाइडारच्या खालीच एक कॅमेरा होता, जो माशाच्या तोंडाची दिशा ओळखून कॉम्प्युटरला सांगत होता. मासा जिथं आपलं तोंड फिरवायचा त्या दिशेने रोबोटिक कारही वळायची. प्राण्यांच्या नेव्हिगेशन सिस्टमला समजून घेणं हाच या अभ्यासाचा उद्देश होता. या प्रयोगात गोल्डफिशाला त्याचा खाणं नेव्हिगेट करण्यासाठी सोडण्यात आलं होतं. दिशा बदलत, थोडं गोंधळत अखेर तो आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचला. या प्रक्रियेता त्याला 2 मिनिटांचा कालावधी लागला. हे वाचा - निळ्या रंगाचा साप कधी पाहिलाय का? VIRAL VIDEO पाहून अवाक झाले नेटकरी प्रयोगात मासा एका एक्वेरिअममध्ये बसून ज्या दिशेला पाहत होता किंवा ज्या दिशेला पोहोत होता त्याच दिशेला कार जात होती.  या पद्धतीच्या प्रयोगाने मासे जमीन किंवा कोणत्याही ठिकाणी कार ड्राइव्ह करू शकतात. माशानंतर आता इतर प्राण्यांवरही हा प्रयोग केला जाणार आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Fish, Viral, Viral videos, While driving

    पुढील बातम्या